News Flash

अभिनेत्री श्वेता प्रसादला ‘सेक्स रॅकेट’ प्रकरणी अटक

मकडी चित्रपटातील आपल्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या तसेच ‘इक्बाल’ चित्रपटात श्रेयस तळपदेच्या बहिणीची भूमिका वठवणाऱ्या श्वेता बसु प्रसाद या अभिनेत्रीला हैदराबाद पोलिसांनी देहविक्रय प्रकरणी

| September 4, 2014 03:58 am

मकडी चित्रपटातील आपल्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या तसेच ‘इक्बाल’ चित्रपटात श्रेयस तळपदेच्या बहिणीची  भूमिका वठवणाऱ्या श्वेता बसु प्रसाद या अभिनेत्रीला हैदराबाद पोलिसांनी देहविक्रय प्रकरणी अटक केली आहे.
हैदराबादमधील बंजारा हिल्स परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ३१ ऑगस्ट रोजी पोलिसांनी  छापा घातला होता. त्यावेळी एका खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत आढळलेल्या श्वेता हिलाही अटक करण्यात आली होती, याबाबत हैदराबादचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त एन. कोटी रेड्डी यांनी बुधवारी माहिती दिली. श्वेताचा दलाल म्हणून काम करणारा बालू यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. तो तेलुगू चित्रपटात साहाय्यक दिग्दर्शक म्हणून कार्यरत होता.  ‘चित्रपटात भूमिका मिळत नसल्यामुळे देहविक्रयाचा मार्ग पत्करला’, असे श्वेताने पोलीस चौकशीत सांगितल्याचे वृत्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2014 3:58 am

Web Title: makdee actress shweta prasad caught in a prostitution racket
Next Stories
1 ‘डीएलएफ’ला जमीन देण्याचा हरयाणा सरकारचा निर्णय न्यायालयाकडून रद्द
2 स्पर्धात्मकतेच्या यादीत भारताची घसरगुंडी
3 निठारी हत्याकांड : आरोपी कोळीला फाशीची शिक्षा
Just Now!
X