सर्व सरकारी मंत्रालये व विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना विद्युत वाहने वापरणे सक्तीचे करावे,असे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

त्यांनी अशी सूचना केली, की विद्युत स्वयंपाक उपकरणे घेण्यासाठी अनुदाने देण्यात यावीत. कारण नाहीतरी आपण स्वयंपाकाच्या गॅससाठी अनुदाने देतच आहोत. लाँच गो इलेक्ट्रिक कॅम्पेनच्यावेळी गडकरी यांनी सांगितले, की स्वयंपाकाच्या विद्युत उपकरणांसाठी आपण अनुदाने का देत नाही? आपण गॅससाठी अनुदान देतच आहोत. विद्युत उपकरणांवर स्वयंपाक केल्याने प्रदूषण होत नाही, गॅसवर असलेले अवलंबित्व कमी होते.   त्यांनी ऊर्जा मंत्री आर.के.सिंह यांना  आवाहन केले, की विद्युत वाहनांचा वापर  अधिकाऱ्यांना सक्तीचा करावा.