टाटा मोटर्सच्या मालकीच्या असलेल्या टीएएल कंपनीने ब्राबो हा मेक इन इंडिया संकल्पनेखाली तयार केलेला रोबोट म्हणजे यंत्रमानव आंतरराष्ट्रीय विक्रीसाठी योग्य ठरला असून युरोपातील बाजारपेठेसाठी त्याला सीई प्रमाणपत्र मिळाले आहे. ब्राबो हा रोबोट मेक इन इंडिया सप्ताहात गेल्या वर्षी प्रदíशत करण्यात आला होता व तो सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगात स्वयंचलीकरणासाठी योग्य आहे. आता युरोपातील आरोग्य, सुरक्षा, पर्यावरण मानकानुसार या रोबोटच्या विक्रीसाठी परवानगी मिळाली आहे. टीएएलचे मुख्य संचालन अधिकारी अमित िभगुर्डे यांनी सांगितले की, सीई प्रमाणपत्रामुळे आमच्या यंत्रमानवाची जागतिक बाजारपेठेत मागणी वाढेल व जिथे कामगार जास्त आहेत अशा उद्योगात त्यांचा वापर शक्य होईल. त्यामुळे मनुष्यबळाचा वापर कमी  होईल, उद्योगांची तांत्रिक आधुनिकता त्यामुळे वाढणार आहे. कच्चा माल हाताळणे, पॅकेजिंग करणे यासाठी या रोबोटचा उपयोग होणार असून तो भारतीय बनावटीचा आहे. सुटे भाग जोडणे, कॅमेरा व दृष्टीशी संबंधित इतर कामे अशा अनेक बाबी तो करू शकतो. ब्राबो हा किफायतशीर म्हणजे कमी किमतीत जास्त काम देत असल्याने बाजारपेठेत लोक तोच पर्याय निवडण्यास अग्रक्रम देतील. लवकरच युरोपात हा रोबोट विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल असे िभगुर्डे यांनी सांगितले.