News Flash

सिंगूरच्या जागेवरील कब्जा सोडण्यासंदर्भात बाजू मांडण्याचे टाटा मोटर्सला आदेश

पश्चिम बंगालमधील सिंगूरमध्ये 'नॅनो' मोटारीचा निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी ताब्यात घेतलेल्या जागेवरील कब्जा सोडण्यासंदर्भात बाजू मांडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी टाटा मोटर्सला दिले.

| July 10, 2013 01:06 am

सिंगूरच्या जागेवरील कब्जा सोडण्यासंदर्भात बाजू मांडण्याचे टाटा मोटर्सला आदेश

पश्चिम बंगालमधील सिंगूरमध्ये ‘नॅनो’ मोटारीचा निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी ताब्यात घेतलेल्या जागेवरील कब्जा सोडण्यासंदर्भात बाजू मांडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी टाटा मोटर्सला दिले. या जागेवर उभारण्यात येणारा प्रकल्प कंपनीने अन्यत्र हलवल्यामुळे आता ही जागा तेथील शेतकऱयांना परत द्यायला हवी, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्या. एच. एल. दत्तू आणि न्या. दीपक मिश्रा यांच्या खंडपीठामध्ये यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी झाली. मोटार निर्मितीसाठी टाटा मोटर्सने ही जागा ताब्यात घेतली होती. मात्र, आता तो उद्देश अस्तित्त्वात नाही. कंपनीने आपला प्रकल्प पश्चिम बंगालबाहेर हलवला आहे. अजूनही आम्हाला ती जागा हवी आहे, असे टाटा मोटर्स म्हणू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
ही जागा परत संबंधित शेतकऱय़ांना दिली पाहिजे, असे सांगून न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला याप्रकरणी शेतकऱयांनी टाटा मोटर्सकडून घेतलेले पैसे परत देण्यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2013 1:06 am

Web Title: make your stand clear over singur land sc to tata motors
टॅग : Tata Motors
Next Stories
1 केरळमध्ये नेतृत्वात बदल नाही – ए. के. अ‍ॅण्टनी
2 मंडेलांची प्रकृती चिंताजनकच
3 स्नोडेनला ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेचे दबावतंत्र
Just Now!
X