लेखक व कलाकारांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे रक्षण करण्यात साहित्य अकादमी वचनबद्ध आहे, असे अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ त्रिपाठी यांनी सांगितले. कन्नड लेखक व संशोधक डॉ. अरविंद मलगट्टी यांनी साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाचा राजीनामा दिला असल्याचे जाहीर केले आहे. कलबुर्गी यांच्या हत्येवर साहित्य अकादमीने मौन पाळल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे. राजीनामा पत्र सचिव व अध्यक्षांना पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. पंजाबचे गुरुबचन भुल्लर, अजमेर सिंह औलाख व आत्मजित सिंह यांनी आज साहित्य अकादमी पुरस्कार परत करणार असल्याचे सांगितले. नयनतारा सेहगल, सारा जोसेफ, उदयप्रकाश व अशोक वाजपेयी यांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले असून कवी सच्चिदानंदन व केकी दारूवाला यांनी कलबुर्गी हत्याप्रकरणी निषेध केला होता व वाढत्या असहिष्णुतेबाबत चिंता व्यक्त केली होती.