News Flash

मलाला युसूफझाई ऑक्सफोर्डमधून ‘ग्रॅज्युएट’; ट्विट करत सांगितला फ्यूचर प्लॅन

मलालावर शुभेच्छांचा वर्षाव

नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफझाली पदवीधर झाली आहे. मलालाने ब्रिटनमधील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित अशा ऑक्सफोर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी मिळविली आहे. मलालाने पदवी मिळाल्याचा आनंद विद्यापीठात आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत साजरा केला. याची माहिती तिने सोशल मीडियावर शेअर करत दिली आहे. मलालाने ट्विटरवर दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने आपल्या कुटुंबासमवेत एक मोठा कार्यक्रम साजरा केला आणि आपल्या भविष्यात काय करायचे आहे, यासंदर्भात खुलासा केला आहे. दुसऱ्या एका फोटोत पदवीनंतर विद्यापीठात केलेल्या जल्लोष दिसून येतोय.

मलाला युसूफझाईचं ट्विट
‘मी ऑक्सफोर्डमधून मी तत्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी मिळवली. याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. पुढे काय आहे हे मला माहिती नाही. आत्तासाठी नेटफ्लिक्स, वाचन आणि झोप हा नित्यक्रम राहणार आहे.’

पदवी मिळाल्याची माहिती सोशल मीडियावर देताच मलालाला सर्वच स्थरातून शुभेच्छा मिळत आहेत. अनेकांनी रिट्वीट करून पदवी प्राप्त झाल्याबद्दल तिचे अभिनंदन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 1:42 pm

Web Title: malala yousafzai completes her oxford degree says now its time for netflix reading and sleep nck 90
Next Stories
1 नेपाळला सोबत घेतलं, आता बांगलादेशला आपल्या बाजूला वळवण्यासाठी चीनची मोठी खेळी
2 सौरव गांगुलीच्या परिवारातील व्यक्तींना करोनाची लागण
3 भारतातल्या खेड्यांनी करोनाशी सामना करत शहरांपुढेही आदर्श ठेवला-मोदी
Just Now!
X