मल्याळी अभिनेता व चार महिलांना अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार कदावथरा येथे  रात्री छापा टाकून १० ग्रॅम कोकेन जप्त केले. पोलिसांनी अभिनेता शाइन टॉम चॅको, सहायक दिग्दर्शक ब्लेसी व तीन तरुणींना अटक केली. ते फ्लॅटवर अमली पदार्थाचा वापर करीत बसलेले होते. हे कोकेन गोव्यातून आणलेले होते व ते जप्त करण्यात आले आहे.