News Flash

अभिनेत्री श्वेता मेननची काँग्रेस खासदाराविरुद्धची तक्रार मागे

मल्याळम प्रसिद्ध अभिनेत्री श्‍वेता मेनन हिने कॉंग्रेसचे खासदार पीतांबर कुरूप यांच्याविरुद्ध छेड काढल्याबद्दल दाखल केलेली तक्रार कुरूप यांनी माफी मागितल्याने मागे घेतली आहे.

| November 4, 2013 03:18 am

मल्याळम प्रसिद्ध अभिनेत्री श्‍वेता मेनन हिने कॉंग्रेसचे खासदार पीतांबर कुरूप यांच्याविरुद्ध छेड काढल्याबद्दल दाखल केलेली तक्रार कुरूप यांनी माफी मागितल्याने मागे घेतली आहे. श्वेता मेनन हिने आज (सोमवार) ई-मेलवरून माध्यमांशी ही माहिती स्पष्ट केली आहे.
शुक्रवारच्या  राष्ट्रपती करंडक नौका स्पर्धेच्या उद्‌घाटन कार्यक्रमात अभिनेत्री श्वेता मेनन हिचा विनयभंग केल्याची फिर्याद कुरूप यांच्या विरोधात पोलिसांनी दाखल करून घेतली होती. त्यांच्यावर भादंवि ३५४ व ३५४ (ए) कलमान्वये महिलेविरुद्ध बळाचा वापर व विनयभंगाचा आरोप दाखल करण्यात आला होता.  नौका स्पर्धेसाठी प्रचंड गर्दी असताना खासदार कुरूप यांनी माझ्याशी गैरवर्तन केले, असा आरोप श्वेता यांनी केला होता.  तसेच, टीव्ही फुटेजमध्येही खासदार प्रेसिडेंट ट्रॉफी बोट रेस कार्यक्रमाच्या वेळी तिच्या दिशने जातात व तिला स्पर्श करतात असे दिसत होते. मात्र, श्वेता यांचे केवळ गर्दीपासून संरक्षण करीत होतो. त्यांची छेड काढलेली नाही, असा खुलासा कुरूप यांनी पत्रकार परिषदेत केला होता. अखेर कुरूप यांनी या प्रकरणी मेनन यांची माफी मागितल्याने हे प्रकरण शांत झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2013 3:18 am

Web Title: malayalam film actress shweta withdraws molestation charge against mp
Next Stories
1 बस्तरमध्ये अभूतपूर्व सुरक्षा
2 राजस्थानमध्ये थाळीफेकपटू पुनियाला काँग्रेसची उमेदवारी
3 गोव्यातील नायजेरियन हे कर्करोगासारखे
Just Now!
X