मालदीवमध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या इब्राहिम मोहमद सोली यांनी शनिवारी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यानंतर मोदींनी ट्विटरवरुन इब्राहिम मोहमद सोली यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी त्यांच्यासोबत काम करायचे आहे’, असे मोदींनी म्हटले आहे.

सप्टेंबरमध्ये मालदीवमध्ये अध्यक्षीयपदासाठी निवडणूक झाली होती. २३ सप्टेंबरला झालेल्या निवडणुकीत सोली यांना एकूण मतांपैकी ५८.४ टक्के मते मिळाली होती. सोली यांच्याकडून पराभूत झालेले यामीन अब्दुल गयूम हे चीनच्या जवळचे असलेले नेते म्हणून ओळखले जायचे. २०१३ साली निवडून आल्यानंतर यामीन यांनी त्यांच्याविरुद्धचे राजकीय मतभेद दडपून टाकताना त्यांचे विरोधक आणि सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना तुरुंगात डांबले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत यामीन अब्दुल गयूम यांचा सोली यांनी पराभव केला. सोली हे भारताचे मित्र मानले जातात.

शनिवारी सोली यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते. शपथविधीनंतर मोदींनी ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी नवनियुक्त राष्ट्राध्यक्षांसोबत काम करायचे आहे, असे मोदींनी म्हटले आहे.