News Flash

आंतरराष्ट्रीय दबावामुळे मालदीवमध्ये वाहिद पायउतार

वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावापुढे नमते घेत अखेर मालदीवचे काळजीवाहू अध्यक्ष मोहम्मद वाहिद यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे

| November 16, 2013 01:40 am

आंतरराष्ट्रीय दबावामुळे मालदीवमध्ये वाहिद पायउतार

वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावापुढे नमते घेत अखेर मालदीवचे काळजीवाहू अध्यक्ष मोहम्मद वाहिद यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. १९ ऑक्टोबर आणि ९ नोव्हेंबर रोजी मालदीवमध्ये अध्यक्षीय निवडणूक होणार होती. मात्र दोन्ही वेळी ही निवडणूक होऊ शकली नाही. यामागे वाहिद यांचाच हात असल्याचा आरोप केला जात होता. काही दिवसांपूर्वी, देशाच्या संविधानाचा दाखला देत मालदिवच्या लोकप्रतिनिधीगृहाच्या सभापतींनीही ‘कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अध्यक्षपदी राहण्याचा हक्क नाही’ असे बजावल्याने वाहिद यांच्यावरील देशांतर्गत दबावही वाढत होता. अखेर वाहिद यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2013 1:40 am

Web Title: maldives president waheed steps down ahead of run off polls
टॅग : Maldives
Next Stories
1 अर्थसंकटातही मित्तल यांचा अमेरिकेला सहारा
2 मध्य प्रदेशात भाजपकडून केवळ एकच मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
3 आणखी एका महिला वकिलाचा न्यायाधीशांविरुद्ध लैंगिक छळवणुकीचा आरोप
Just Now!
X