07 March 2021

News Flash

एकल पालकत्व स्वीकारलेल्या पुरूष कर्मचाऱ्यांना मिळणार ‘चाइल्डकेअर लीव्ह’

केंद्र सरकारचा मोठा निर्णय

प्रातिनिधीक छायाचित्र

एकल पालकत्व स्वीकारलेल्या पुरूष कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. एकल पालकत्व स्वीकारलेल्या सरकारी सेवेतील पुरूष कर्मचाऱ्यांनाही आता चाईल्डकेअर लीव्हचा लाभ घेता येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी याबाबत घोषणा केली. एकल पालकत्व स्वीकारलेले पुरूष कर्माचारी म्हणजे विधुर, घटस्फोटीत अथवा अविवाहित कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचं जितेंद्र सिंह म्हणाले. तसंच हा मोठा निर्णय असून सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासंदर्भातील आदेश यापूर्वीच देण्यात आले होते. परंतु काही कारणास्तव सार्वजनिकरित्या हा निर्णय सर्वांपर्यंत पोहोचला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

“ज्या कर्मचाऱ्यांना सद्यस्थितीत चाईल्डकेअर लीव्ह हवी आहे अशा कर्मचाऱ्यांची ती सुट्टी यापूर्वीच मंजूर करण्यात आली आहे. तसंच कर्मचाऱ्यांना चाईल्ड केअर लीव्हवर असताना लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशनचा लाभही घेता येणार आहे. पहिल्या वर्षात संपूर्ण चाईल्ड केअर लीव्ह ही भरपगारी रजा म्हणूनही वापरता येईल. तसंच दुसऱ्या वर्षी भरपगारी रजेच्या ८० टक्केच चाईल्ड केअर लीव्हच्या स्वरूपात वापरता येईल,” असंही सिंह यांनी स्पष्ट केलं. याव्यतिरिक्त दिव्यांग बालकांच्या देखभालीसाठीही नियम तयार करण्यात आले आहे. याअंतर्गत कोणत्याही कर्मचाऱ्याला कोणत्याही क्षणी चाईल्ड केअर लीव्हचा लाभ घेता येणार आहे. परंतु यासाठी बालकाच्या वयाची अट ठेवण्यात आली असून सर्वाधिक वय २२ वर्षे निश्चित करण्यात आलं आहे.

“या नव्या सुधारणांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष रस दाखवला होता. त्यामुळेच काही महत्त्वाचे निर्णयही घेता आले. गेल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात सरकारनं अनेक सुधारणा करणारी पावलं उचलली आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी उत्तमोत्तम काम करावं हा यामागील उद्देश आहे,” असंही जितेंद्र सिंह म्हणाले. तसंच गेल्या काही वर्षांमध्ये भ्रष्टाचाराविरोधात सरकारी कर्मचाऱ्यांवर कठोर निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 9:38 am

Web Title: male govt employees who are single parents can now take child care leave mos jitendra singh jud 87
Next Stories
1 “नऊ तासांच्या चौकशीत मोदींनी चहादेखील घेतला नव्हता”
2 Bihar Election : नितीश कुमार शारीरिक, मानसिकरित्या थकलेले म्हणूनच…; तेजस्वी यादवांचा हल्लाबोल
3 राज्यात बोलण्यावर निर्बंध!
Just Now!
X