29 October 2020

News Flash

ममतांकडून नितीश कुमार यांचे अभिनंदन, आभारही मानले

जदयू कार्यकारणीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाचे केले स्वागत

सध्या पश्चिम बंगालमध्ये भाजपा व टीएमसी यांच्यात कमालीचा तणाव वाढलेला असताना, दुसरीकडे भाजपाचा मित्र पक्ष व एनडीए आघाडीचा घटक पक्ष असलेल्या जदयूचे प्रमुख व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आभार व्यक्त करत अभिनंदन केले आहे.

जदयूच्या कार्यकारणीच्या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी बिहार बाहेर ते एनडीएबरोबर निवडणुका लढवणार नसल्याचे रविवारी जाहीर केले होते. त्यांच्या या निर्णयामुळे ममता यांनी त्यांचे आभार व्यक्त करत अभिनंदन केले आहे. ममता यांनी सोमवारी याबाबत म्हटले की, मी आताच नितीश कुमार यांच्या या वक्तव्याबद्दल माहिती मिळीली आहे, ज्यात त्यांनी म्हटले आहे की ते बिहारच्या बाहेर एनडीएबरोबर राहणार नाहीत. मी त्यांचे यासाठी अभिनंदन करते व धन्यवादही व्यक्त करते.

जदयूच्या कार्यकारणीच्या बैठकीनंतर जम्मू कश्मीर, झारखंड, हरियाणा आणि दिल्लीत होणा-या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचेही नितीश कुमार यांनी सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 5:28 pm

Web Title: mamata banerje congratulate to cm nitish kumar msr 87
Next Stories
1 वडिलांना न्याय मिळून देण्यासाठी १३ वर्षीय मुलाने मोदींना पाठवली ३७ पत्रे, पण…
2 अलीगढ हत्याकांड प्रकरणातील गुन्हेगारांना फाशी द्या
3 Kathua gang rape and murder case: न्यायालयाच्या निर्णयावर मेहबुबा मुफ्ती म्हणतात..
Just Now!
X