News Flash

“मी माझा फोन प्लास्टर करून टाकलाय, सगळंच रेकॉर्ड केलं जातंय”, ममतादीदींचा मोदी सरकारवर खोचक टोला!

पेगॅसस प्रकरणावरून देशभर विरोधकांचा गदारोळ सुरू असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

ममता बॅनर्जी यांची मोदी सरकारवर खोचक टीका

गेल्या काही दिवसांपासून देशात पेगॅसस प्रकरणावरून बराच गदारोळ सुरू झाला आहे. विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर या मुद्द्यावरून तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. देशातील अनेक राजकीय नेते, प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन पेगॅसस स्पायवेअरच्या मदतीने हॅक केले गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. केंद्रानं हा आरोप फेटाळला असला, तरी त्यावरून आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर खोचक टीका केली आहे. पेगॅससमुळे मी माझा फोनच प्लास्टर करून टाकला आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. हुतात्मा दिनाच्या निमित्ताने ७ राज्यांमधील तृणमूलच्या कार्यकर्त्यांशी ममता बॅनर्जी यांनी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.

“कुठे आहे पीएम केअर फंड?”

यावेळी बोलताना ममता बॅनर्जी यांनी केंद्रावर तीव्र शब्दांत टीका देखील केली. “३.७ लाख कोटी रुपये केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलमधून गोळा केले आहेत. हा पैसा ते कुठे खर्च करत आहेत. लोकांना लस, औषधं मिळत नाहीयेत. पीएम केअर फंड कुठे आहे?”, असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

“या सरकारला देखील प्लास्टर लावलं पाहिजे”

दरम्यान, पेगॅससच्या मुद्द्यावरून ममता बॅनर्जी यांनी केंद्राला खोचक टोला लगावला आहे. “आता पेगॅसस आलंय. मी तर माझा फोन प्लास्टर करून टाकला आहे. कॅमेऱ्यामध्ये सगळं रेकॉर्ड केलं जात आहे. काय करणार? कॅमेरा, ऑडिओ, व्हिडीओमध्ये सगळं रेकॉर्ड करून घेतलं जातं. त्यामुळे मी पूर्ण कॅमेऱ्यालाच प्लास्टर लावून टाकलं. या केंद्र सरकारला देखील प्लास्टर लावून टाकलं पाहिजे. नाहीतर देश बरबाद होऊन जाईल. कुणावरच विश्वास राहिलेला नाही. केंद्र सरकारमध्ये देखील त्यांच्या मंत्र्यांचे फोन देखील हॅक केले जात आहेत”, असं त्या म्हणाल्या.

फोन टॅपिंग : जबाबदार कोण?, आदेश कोणी दिले हे जनतेला कळलं पाहिजे : अजित पवार

“लोकशाही तीन घटकांची मिळून बनते. प्रसारमाध्यमे, न्यायपालिका आणि निवडणूक आयोग. पेगॅससने या तिघांनाही निगराणीखाली आणलं आहे. येत्या २७ आणि २८ जुलै रोजी मी दिल्लीमध्ये असणार आहे. जर केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांची बैठक बोलावली गेली, तर मी त्यासाठी दिल्लीत उपलब्ध असेन”, असं देखील त्यांनी यावेळी सांगताना विरोधी पक्षांना एकत्र येऊन बैठक घेण्याचं आवाहन केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 3:25 pm

Web Title: mamata banerjee mocks modi government on pegasus spyware in india pmw 88
Next Stories
1 अंगावर काटा आणणारा घटनाक्रम; आधी गोळ्या घातल्या; भारतीय असल्याचं समजताच दानिशच्या डोक्यावरून…
2 पंजाब : नवज्योतसिंग सिद्धू यांचं शक्ती प्रदर्शन! आमदारांसह सुवर्ण मंदिरात घेतले दर्शन
3 सरकारी नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथीयांसाठी १ टक्के जागा राखीव; कर्नाटक सरकारचा ऐतिहासिक निर्णय!
Just Now!
X