26 September 2020

News Flash

#CBIvsMamata: ममता, मोदी, भाजपा, CBI सगळ्यांनाच नेटकऱ्यांनी केले ट्रोल, पाहा व्हायरल मिम्स

'HOW IS THE खौफ, High सर...'

व्हायरल मिम्स

चिट फंड गैरव्यवहारप्रकरणी कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी गेलेल्या ‘सीबीआय’ अधिकाऱ्यांनाच तेथील पोलिसांनी गाडीत कोंबून पोलीस ठाण्यात आणल्याची घटना रविवारी घडली. लॉडन स्ट्रिटवर रंगलेल्या या नाट्याचे स्वरूप ममता बॅनर्जी विरुद्ध केंद्र सरकार असे होते. हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे. मंगळवारी सुप्रीम कोर्टात या याचिकेवर सुनावणी झाली. कोलकाता पोलीस आयुक्तांनी सीबीआयसमोर चौकशीसाठी हजर रहावे, असे आदेश सुप्रीम कोर्टाने कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना दिले आहेत. राजीव कुमार यांनी तपासात सहकार्य करावे, असे सांगतानाच सीबीआयने देखील राजीव कुमार यांना अटक करु नये, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. एकीकडे बंगालपासून राज्यसभेपर्यंत याच प्रकरणाचे पडसाद उमटत असताना नेटकरी मात्र या संपूर्ण प्रकरणाची मजा घेताना दिसत आहेत. #CBIvsMamata हा हॅशटॅग वापरून अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा, ममता बॅनर्जी अशा सर्वांवरील मिम्स व्हायरल झाले आहेत. पाहुयात असेच काही व्हायरल झालेले मिम्स…

आत आलात बाहेर कसे जाणार

कारण दिदीने बोला

तेव्हा आणि आता…

अटकेनंतर

जेव्हा कोणी बंगालमध्ये लोकशाहीबद्दल बोलतं

त्या पंतप्रधान झाल्या तर

HOW IS THE खौफ

गेले आणि आले तेव्हा

घ्या आता यांनी सीबीआयलाच पकडलं

अपेक्षा आणि…

गेले आणि त्यानंतर…

गेले आणि पकडले गेले त्यातील फरक

कोलकात्याला गेले आणि त्यानंतरची रिअॅक्शन

ममता बॅनर्जींची टॅगलाइन?

सिंघम

ममतांचा सल्ला

अपना धरणा आऐगा

परिस्थिती

आमच्या कमेन्टी वाट पाहताना…

नाव तर ऐकले असेल

काँग्रेस ट्विट डिलीट करताना

आधी आणि नंतर

कोणाचं काय तर कोणाचं काय

दरम्यान कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना अटक करु नये, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला हा आमचाच नव्हे तर जनतेचा विजय आहे असे मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे. आपण सहकार्य करणार नसल्याचं राजीव कुमार यांनी सीबीआयला कधीही म्हटलं नव्हतं. तर यासंदर्भात पाच पत्रे त्यांनी सीबीआला लिहीली आहेत, त्यामुळे ही केस आमच्याच बाजूने आहे, असा दावा करताना मोदी बिग बॉस नव्हेत तर लोकशाही व्यवस्था देशाची बिग बॉस आहे, अशा शब्दांत बॅनर्जी यांनी पंतप्रधानांवर कठोर शब्दांत टीका केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 5:48 pm

Web Title: mamata banerjees dharna against the cbi just sparked a meme fest online
Next Stories
1 राजीव कुमारांवर कारवाई करा; केंद्र सरकारचे पश्चिम बंगाल सरकारला निर्देश
2 पाकिस्तानचा भारतीय लष्कराच्या तळावर रॉकेट लाँचरने हल्ला
3 ममतादीदी लाज आणली..योगी आदित्यनाथांचा प्रहार
Just Now!
X