दिल्लीत नियोजन आयोगाच्या कार्यालयाबाहेर ममता बॅनर्जी आणि अर्थमंत्री अमित मिश्रा यांना एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या धक्काबुक्कीनंतर त्याचे पडसाद आज(गुरूवार) कोलकतायेथील प्रसिडेंसी विद्यालयात उमटले. तृणमूल काँग्रेस विद्यार्थीसंघटनेच्या काही विद्यार्थ्यांनी प्रेसीडेंसी महाविद्यायाच्या ऐतिहासिक प्रयोगशाळेची तोडफोड केली. या प्रयोगशाळेचे नुकतेच  नुतनीकरण झाले होते आणि ११ मार्च रोजी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी या प्रयोगशाळेचे उदघाटन केले होते.
घटनेच्या प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी अकराच्या सुमारास जवळपास १५० विद्यार्थ्यांनी लोखंडी गज घेऊन प्रेसीडेंसी विद्यालयात प्रवेश केला आणि प्रयोगशाळेची तोडफोड करण्यास सुरूवात केली. त्यावेळी वर्गात भौतिकशास्त्राचा तास सुरू होता. आंदोलक विद्यार्थ्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांनाही मारहाण केली. यात वर्गातील दोन विद्यार्थी जखमी झाल्याचे समजते