21 September 2020

News Flash

‘निवडणुका रोखण्याचे विरोधकांचे षड्यंत्र’

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रोखण्याचे षड्यंत्र माकप, काँग्रेस आणि भाजप यांनी रचले असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. विरोधकांना पराभवाची

| June 27, 2013 02:03 am

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रोखण्याचे षड्यंत्र माकप, काँग्रेस आणि भाजप यांनी रचले असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.  विरोधकांना पराभवाची भीती असल्याने ते निवडणूक प्रक्रिया रोखण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका ममतांनी जंगलमहल येथील प्रचारसभेत केली. तृणमूल काँग्रेस या निवडणुकांमध्ये विजय मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधक केवळ केसेस दाखल करण्यात पैसे खर्च करत आहेत. प्रचारात ते कोठेच दिसत नसल्याचा आरोपही ममतांनी केला. या निवडणुका जर नियोजित वेळेत झाल्या नाहीत तर त्याला विरोधक जबाबदार असतील असा इशारा त्यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2013 2:03 am

Web Title: mamata charges opposition with conspiracy to stall poll
टॅग Mamata Banerjee
Next Stories
1 गोव्यात ‘रेड अ‍ॅलर्ट’
2 नेल्सन मंडेला यांची प्रकृती आणखी खालावली
3 हेलिकॉप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोन जवान शहीद
Just Now!
X