पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी आणि भाजपाच्या बड्या नेत्यांमध्ये होणाऱ्या ‘तू तू मैं मैं’वरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच ममता बॅनर्जी भाजपामुळे देशाचे कसे वाटोळे झाले हे बंगालमधील लोकांना वारंवार पटवून देत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता तर ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना मदतीचे अवाहन करण्यासाठी पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, कृपया आमच्या सरकारला मुबलक प्रमाणात कोव्हिडच्या लसी उपलब्ध करून द्याव्यात म्हणजे निवडणुकीपूर्वी बंगालमधील सर्व जनतेचे लसीकरण करता येईल.

पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्यांच्या सरकारला राज्यातील सर्व लोकांना मोफत लस देण्याची इच्छा आहे. “पश्चिम बंगाल सरकारने जनतेसाठी पुरेशा प्रमाणात लस घेण्याचे ठरविले आहे. केंद्र सरकारने ही बाब प्राधान्याने लक्षात घ्यावी, यासाठी आम्ही विनंती करतो. जेणेकरुन राज्य सरकार नियुक्त केलेल्या लसी खरेदी करू शकेल. कारण पश्चिम बंगाल सरकारला सर्व लोकांना मोफत लसीकरण देण्याची इच्छा आहे”, असे ममता बॅनर्जी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

त्या म्हणाल्या की, आतापर्यंत राज्यात लसीकरण मोहिमेत आरोग्य कर्मचारी, पोलिस, नगरसेवक आणि इतर फ्रंटलाईन कामगारांना लसी देण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगाल मतदानाची तयारी करीत असल्याने निवडणूक आणि जनतेच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक सरकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना कोविड -१९ लसीकरण मोहिमेत समाविष्ट करणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mamata writes letter to pm modi asking for help for free vaccination in bengal sbi
First published on: 24-02-2021 at 18:20 IST