28 February 2021

News Flash

भर रस्त्यात दिवसाढवळया त्याने ‘तिला’ रोखलं आणि केलं नको ते कृत्य

तरुणीला धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं.

देश आणि राज्य पातळीवर महिला सुरक्षेसाठी कठोर कायदे बनवण्यात आले आहेत. पण असे असूनही, देशाच्या वेगवेगळया भागात आजही महिलांना काही पुरुषांच्या विकृत मानसिकतेचा सामना करावा लागतोय. अहमदाबादच्या नवरंगपुरा भागात शुक्रवारी दुपारी एका तरुणीला अशाच एका धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं. पीडित तरुणी कायद्याची विद्यार्थिनी असून, भर दिवसाढवळ्या एका अज्ञात आरोपीने तरुणीचा विनयभंग केला. अहमदाबाद मिररने हे वृत्त दिले आहे.

काय घडलं?
पीडित तरुणी कायद्याचे शिक्षण घेत असून ती एका खासगी कंपनीत नोकरी करते. शुक्रवारी दुपारी ती, ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने सामवेद रुग्णालयाजवळच्या एका कॉम्पलेक्समध्ये गेली होती. त्याचवेळी दुचाकीवरुन एक तरुण तिथे आला व पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिला थांबवले. आपल्याला संबंधित ठिकाण कुठे आहे, ते माहित नाही असे  तरुणीने त्याला सांगितले. पण तरीही तो तिला सतत माहिती विचारत होता. अखेर ती त्याला मदत करण्याच्या हेतूने दिशा सांगू लागली. त्यावेळी अचानक त्याने तूला मासिक पाळी चालू आहे का? अशी विचारणा केली.

“त्यानंतर त्याने माझ्या शरीरावरुन अश्लील टिप्पणी केली. लगेचच त्याने त्याच्या पँटची चैन खाली खेचली व आपले गुप्तांग काढून दाखवलं. मी आरडाओरडा सुरु करताच त्याने तिथून पळ काढला” असे पीडित तरुणीने सांगितले.

“आपण जे करतोय, त्या बद्दल त्या तरुणाच्या डोळयात पश्चातापाची कुठलीही भावना नव्हती. पण मला सर्वात जास्त दु:ख झाले, ते लोकांच्या शांत असण्याचे. ही घटना घडली त्यावेळी पार्किंग लॉटमध्ये पाच जण होते. पण कोणीही माझ्या मदतीसाठी पुढे आले नाही” असे पीडित तरुणीने सांगितले.  या घडलेल्या प्रकाराबद्दल तरुणीने महिला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2021 2:27 pm

Web Title: man abuses flashes at law student in navrangpura ahmedabad dmp 82
Next Stories
1 काँग्रेसनेच घडवली सुभाषचंद्र बोस यांची हत्या – साक्षी महाराजांचा खळबळजनक आरोप
2 शेतकऱ्यांच्या नजरा दिल्ली पोलिसांकडे; दोन लाख ट्रॅक्टरची काढणार रॅली
3 खान मार्केटमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा
Just Now!
X