News Flash

न्यूड फोटोच्या सहाय्याने १०० महिलांची फसवणूक करणारा गजाआड

पीडित महिलेच्या तक्रारीनंतर अटकेची कारवाई

न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलांना ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. २६ वर्षीय आरोपीविरोधात दिल्लीमधील एका महिलेने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आरोपी महिलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी करत होता. सुमित झा असं या आरोपीचं नाव असून सध्या तो अटकेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमीत झा याला यआधीही छत्तीसगडमध्ये अशाच एका केसमध्ये अटक झाली होती. त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. सुमीत महिलांकडे पैसे तसंच गुप्तांगाचे फोटो पाठवण्याची मागणी करायचा. महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी वापरत असलेला मोबाइलही जप्त करण्यात आला आहे.

दिल्लीमधील महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे लैंगिक छळ आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, “आरोपीने माझं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक केलं होतं. जर माझी पैशांची मागणी पूर्ण केली नाही तर न्यूड फोटो पोस्ट करेन अशी धमकी त्याने दिली होती. इतकंच नाही तर माझ्या संपर्क यादीतील मित्रांकडेही पैसे मागितले”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 4:32 pm

Web Title: man arrested for blackmailing 100 women using fake nude pictures sgy 87
Next Stories
1 हे काय? मोफत उपचार मिळणार म्हणून भाजपा खासदाराने राजीनामा घेतला मागे
2 झाडाची पानं तोडल्याने मारहाण झालेल्या दलित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
3 आंतरराष्ट्रीय विमानांवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी, मोदी सरकारचा मोठा निर्णय
Just Now!
X