25 November 2020

News Flash

धक्कादायक! वयाची पासष्टी ओलांडलेल्या वृद्ध महिलेवर बलात्कार

वयाची पासष्टी ओलांडलेल्या वृद्ध महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

वृद्ध महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

वयाची पासष्टी ओलांडलेल्या वृद्ध महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी सोनभद्र जिल्ह्यातून आरोपीला अटक केली आहे. एक डिसेंबर रोजी हा गुन्हा घडला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला राम किशनला अटक केली.

या धक्कादायक घटनेबद्दल माहिती देताना सर्कल अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला माहिती मिळताच आम्ही एफआयआर दाखल केला. आरोपीला अटक करण्यात आली असून महिलेवर उपचार सुरु आहेत.” समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोमवारी महिलांविरोधात घडणाऱ्या गुन्ह्यांवर राज्य सरकारला धारेवर धरले.

भाजपाच्या राजवटीत महिला आणि मुली सुरक्षित नसल्याची टीका त्यांनी केली. “उत्तर प्रदेशात दिवसेंदिवस महिलांची स्थिती खराब होत आहे. दर दिवशी बलात्काराच्या घटना घडत आहेत. बेटी बचाओ, बेटी पढाओचे पुरस्कर्ते या अमानवीय घटना रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.” अशा शब्दात अखिलेश यादव यांनी योगी सरकारचा समाचार घेतला.

हैदराबाद झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर हा गुन्हा समोर आला आहे. हैदराबादमधील घटनेवरुन सध्या संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. वेगवेगळया भागात आंदोलने सुरु आहेत. मृत मुलीला न्याय मिळाला पाहिजे तसेच महिला सुरक्षेसाठी कायदे अधिक कठोर करण्याची मागणी होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2019 12:15 pm

Web Title: man arrested for raping old woman in sonbhadra dmp 82
Next Stories
1 जामीन मिळाल्याचा आनंद गोळीबार करुन केला साजरा, पुन्हा गेला तुरुंगात
2 केवळ माझ्या कुटुंबाशीच नव्हे तर संपूर्ण देशाच्या सुरक्षेशी खेळ सुरु – रॉबर्ट वढेरा
3 #HyderabadHorror: “…तर माझ्या मुलाला जाळून टाका”; आरोपीच्या आईची मागणी
Just Now!
X