01 March 2021

News Flash

सोशल मीडियावरुन महिलेवर पाळत ठेवणाऱ्याला अटक

वेगवेगळया सोशल मीडिया अकाऊंटवरुन महिलेवर पाळत ठेवणाऱ्या एका २४ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

वेगवेगळया सोशल मीडिया अकाऊंटवरुन महिलेेवर पाळत ठेवणाऱ्या एका २४ वर्षीय आरोपीला नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. नोएडाच्या सेक्टर २० मधील पोलीस स्थानकात रजत श्रीवास्तव विरोधात बुधवारी तक्रार दाखल करण्यात आली होती. महिलेला त्रास देण्याच्या हेतूने रजत सोशल मीडियावर तिच्या मागावर असतो असा आरोप महिलेच्या भावाने केला होता.

आरोपी एका खासगी कंपनीत अकाऊंट विभागात काम करतो. तो संबंधित महिलेला गेल्या अनेकवर्षांपासून ओळखतो. सेक्टर १५ मध्ये राहणाऱ्या महिलेने व्यक्तीगत कारणांमुळे आरोपीबरोबर काही वर्षांपूर्वी संबंध तोडले व यापुढे आपल्याशी संपर्क साधू नको असे सांगितले. रजत फेसबुक, टि्वटर आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवरुन महिलेवर पाळत ठेऊन होता.

महिलेच्या संमतीशिवाय दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची त्याने धमकी दिली होती असे स्टेशन हाऊस ऑफिसर मनोज कुमार पंत यांनी सांगितले. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष टीम बनवली व गुरुवारी सेक्टर २७ च्या सब मॉल येथून अटक केली. आरोपीने गुन्ह्यामध्ये वापरलेला मोबाइल फोन आणि सीम कार्ड पोलिसांनी जप्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2019 5:40 pm

Web Title: man arrested for stalking woman on social media
Next Stories
1 उत्तर भारतीय समाज हा मुंबईचा कणा-पूनम महाजन
2 फक्त जेटली-शाहच नव्हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे सहकारी सुद्धा आजारी
3 अमित शाह यांच्या स्वाइन फ्लूबाबत बोलताना काँग्रेस नेत्याची जीभ घसरली…
Just Now!
X