26 January 2020

News Flash

बाथरुममध्ये शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने पतीची पत्नीला मारहाण

"तो जबरदस्तीने बाथरुममध्ये नेऊन माझ्यावर अत्याचार करायचा"

(प्रातिनिधिक फोटो)

अहमदाबादमधील एका १९ वर्षीय महिलेने गोमतीपूर पोलीस स्थानकामध्ये आपल्याच पतीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. भावनगर येथे राहणाऱ्या या महिलेने पती मारहाण करत असल्याचे आपल्या तक्रारीत म्हटले आहे. बाथरुममध्ये शरीरसंबंध ठेवण्यासाठी पती आपल्यावर बळजबरी करायचा आणि आपण नकार दिल्यास तो मारहाण करायचं असं या महिलेने पोलिसांना सांगितलं आहे.

या महिलेचे अवघ्या चार महिन्यापूर्वीच लग्न झाले आहे. घरी ती एकटीच असताना तिचा दीर तिची छेड काढतो असेही तिने या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. हुंड्यासाठी माझ्या सासरच्या लोकांनी लग्नानंतर काही आठवड्यांमध्ये माझा छळ करु लागले. अनेकदा मला माझ्या सासरचे लोक रात्री अपरात्री झोपेतून उठवून मारहाण करायचे. तुझ्या माहेरून हुंडा घेऊन ये असं ते सतत मला सांगायचे. असंही या महिलेने आपल्या तक्रारीमध्ये नमूद केलं आहे.

“माझा नवरा माझ्यावर बळजबरी करायचा. शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा नसली तरी तो जबरदस्तीने बाथरुममध्ये नेऊन माझ्यावर अत्याचार करायचा. जेव्हा जेव्हा मी त्याला बाथरुममध्ये शरीरसंबंध ठेवण्यास नकार द्यायचे तेव्हा तो मला मारहाण करायचा आणि बळजबरीने माझ्याबरोबर शरीरसंबंध ठेवायचा,” असा गंभीर आरोप या महिलेने केला आहे.

घरी एकटी असताना दीरही माझ्यावर अत्याचार करायचं असं या माहिलेने म्हटलं आहे. सततच्या छळाला कंटाळून ही पिडित महिला स्वत:च्या माहेरी निघून गेली. गोमतीपूर येथे माहेरी आल्यावर या महिलेने संबंधित प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणात या महिलेचा नवरा आणि तिच्या सासरच्या चार लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये घरगुती हिंसा, छेडछाड करणे, मारहाण करणे, अपशब्द वापरणे या प्रकरणामद्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published on August 14, 2019 12:59 pm

Web Title: man assaults wife for denying him bathroom sex scsg 91
Next Stories
1 काश्मीरमध्ये विनाअट येण्यास तयार, कधी येऊ सांगा -राहुल गांधी
2 सीमावाद सोडवण्याची चीनची इच्छा, विशेष प्रतिनिधी म्हणून NSA अजित डोवाल करणार चर्चा
3 अभिनंदन सोनियांचे पण चर्चा मात्र वढेरांची
Just Now!
X