मित्राच्या आई बरोबर प्रेमसंबंध ठेवणाऱ्या व्यक्तीला शेजाऱ्यांनी बदडून काढल्याची घटना अहमदाबादमधील कालोल तालुक्यात घडली आहे. कालोल पोलिसांनी या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. मोटो ठाकोरवास येथे राहणारा विजयजी ठाकोर बुधवारी विरामजी ठाकोर या आपल्या मित्राच्या घरी गेला होता. विजयजीचे विरामजीची आई साजाबेन बरोबर प्रेमसंबंध असल्याने तिला भेटण्यासाठी विजयजी तिथे गेला होता.
विरामजी त्यावेळी घरी नव्हता. विजयजी आणि साजाबेन घरात असताना जागाजी शंकजी ठाकोर, नीनाजी ठाकोर, अर्जनजी ठाकोर आणि मथुरजी ठाकोर तिथे आले. त्यांनी विजयजीला तू इथे का आला आहेस ? असा जाब विचारला. त्यावर त्याने आपले या महिलेबरोबर प्रेमसंबंध असल्याने आपण इथे आलो आहोत असे उत्तर दिले.
विजयजीच्या उत्तराने संतापलेल्या चौघांनी त्याला आणि साजाबेनला काठिने जबर मारहाण करुन जखमी केले. दोघांना रुग्णालयात दाखल केले असून पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 15, 2018 1:41 pm