News Flash

पत्नी माहेरी गेली म्हणून नवऱ्याने स्वत:चे गुप्तांग कापले

मंगळवारी रात्री नववर्ष साजरं करण्यासाठी ती पुन्हा घरी आली होती.

भांडणानंतर पत्नी माहेरी निघून गेली, म्हणून हताश झालेल्या नवऱ्याने स्वत:चे गुप्तांग कापले. मंगळवारी रात्री चेन्नईच्या न्यू वॉशरमेनपेट भागात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याला मूल होत नव्हते, त्यावरुन त्यांच्यात सतत भांडणे व्हायची. नवऱ्याची दारु पिण्याची सवयही पत्नीला अजिबात आवडत नव्हती.

सोमवारी रात्री भांडण झाल्यानंतर पत्नीने घटस्फोटाची मागणी केली व ती तिच्या आई-वडिलांच्या घरी निघून गेली. मंगळवारी रात्री नववर्ष साजरं करण्यासाठी ती पुन्हा घरी आली होती. त्यावेळी नवरा दारुच्या नशेमध्ये होता. त्यावरुन दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. पत्नी पुन्हा माहेरी निघून गेली.

त्यामुळे हताश झालेले नवरा स्वयंपाक घरात गेला व चाकूने स्वत:चे गुप्तांग कापले. गंभीर जखमी झाल्याने तो आरडाओरडा करत होता. ते ऐकून शेजारी तिथे आले व त्यांनी त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2020 1:39 pm

Web Title: man cuts genitals after wife leaves home during quarrel dmp 82
Next Stories
1 आपण मुलांना कॉन्व्हेन्ट शाळांमध्ये शिकवतो त्यामुळे ते गोमांस खातात – गिरिराज सिंह
2 VIDEO: पोप फ्रान्सिस यांनी मागितली महिलेची माफी
3 वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतात ६७ हजार बालकांचा जन्म
Just Now!
X