News Flash

मुलीचं शीर कापून पोलीस ठाण्यात नेत होता; रस्त्यावरील ‘ते’ दृश्य पाहून खळबळ

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल

प्रातिनिधिक फोटो

उत्तर प्रदेशात हरदोई जिल्ह्यातील गावात एकच खळबळ उडाली जेव्हा एक व्यक्ती हातामध्ये आपल्या १७ वर्षाच्या मुलीचं शीर घेऊन अत्यंत शांतपणे रस्त्यावरुन चालत निघाला होता. समोरचं ते चित्र पाहून घाबरलेल्या गावकऱ्यांना नेमकं काय करावं सुचत नव्हतं. यावेळी त्यांच्यातील एका व्यक्तीने पोलिसांना फोन करुन माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दोन अधिकारी घटनास्थळी पोहोचले असता यामधील एकाने मोबाइलवर हा सगळा प्रकार रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. त्यांनी त्याला नाव, गाव तसंच शीर कोणाचं आहे असे अनेक प्रश्न विचारले. आरोपी सर्वेशदेखील सर्व प्रश्नांची शांतपणे उत्तर देत होता. व्हिडीओत त्याने हे शीर आपल्या १७ वर्षाच्या मुलीचं असून तिचे एका व्यक्तीशी संबंध असल्यानेच आपण हत्या केल्याची कबुली दिली आहे.

“मीच केलं आहे, तिथे अन्य कोणी नव्हतं. मीच कडी लावली आणि हत्या केली. मृतदेह रुममध्येच आहे,” असं आरोपी वडील सांगताना दिसत आहे. यावेळी पोलीस त्याला हातातील शीर खाली ठेवून रस्त्याच्या कडेला बसण्यास सांगतात. यावेळीही आरोपी कोणता विरोध करत नाही. आरोपी सर्वैशला पोलीस ठाण्यात आणण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 8:34 am

Web Title: man cuts off daughters head in uttar pradesh sgy 87
Next Stories
1 Ayesha suicide : …तर तुम्ही माणूस म्हणवण्याच्या लायकीचे नाहीत; ओवेसी संतापले
2 पेट्रोल पंपांवरील मोदींचा फोटो असणारे होर्डिंग ७२ तासांत हटवा; निवडणूक आयोगाचा आदेश
3 दिल्ली महापालिका पोटनिवडणुकीत पाचही जागांवर भाजप पराभूत
Just Now!
X