काचेच्या तुकड्याने स्वत:चा गळा चिरुन एका युवकाने प्रेयसीच्या घरातच जीवन संपवलं. चेन्नईच्या विरुगामबाक्कममध्ये शनिवारी सकाळी ही घटना घडली. मृत युवक पदवीधर असून अरीयालुरचा रहिवासी आहे. हा युवक प्रेयसीच्या घरातच राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो युवक घरातच गॅस सिलिंडरचा स्फोट घडवून प्रेयसी आणि तिच्या आई-वडिलांना मारण्याच्या प्रयत्नात होता.
मुलगी आणि तिचे आई-वडिल बेडरुममध्ये झापलेले असताना, पहाटे तीनच्या सुमारास घरातील आवाजाने उठले. त्यांनी पाहिले, तेव्हा युवक सिलिंडर खेचून हॉलमध्ये आणत होता. तो घरात सिलिंडरचा स्फोट घडवण्याचा प्रयत्न करतोय, हे लक्षात आल्यानंतर मुलीने आणि तिच्या आई-वडिलांनी त्याला घराबाहेर ढकललं व दार बंद करुन घेतलं. त्यांनी लगेच पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
पोलीस दाखल होण्याआधीच त्या युवकाने तुटलेल्या काचेच्या तुकड्याने स्वत:चा गळा चिरुन घेतला. पोलीस पोहोचले, तेव्हा कॉरिडोअरमध्ये तो बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. पोलिसांनी लगेच त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्या युवकाला मृत घोषित केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 5, 2020 6:23 pm