20 November 2019

News Flash

धक्कादायक! मेट्रो स्टेशनवर महिलेसमोर हस्तमैथुन

दुकानातून बाहेर पडून शिडयांवरुन उतरत असताना माझ्या पाठिमागे काहीतरी चुकीचे घडत असल्याचे मला जाणवले.

संग्रहित छायाचित्र

दिल्लीच्या यलो लाईन मार्गावर मागच्या शुक्रवारी एका महिलेला धक्कादायक अनुभव आला. हुडा सिटी सेंटर मेट्रो स्टेशनच्या शिडयांवरुन उतरत असताना महिलेच्या मागे एक जण हस्तमैथुन करत होता. १४ जून रोजी ही धक्कादायक घटना घडली. महिलेने त्याच दिवशी रात्री फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून गुरुग्राम पोलिसांशी संपर्क साधला व घडला प्रकार सांगितला. पण त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही.

त्यानंतर महिलेने दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनशी संपर्क साधला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवण्यासाठी त्यांनी रविवारी संबंधित महिलेला बोलावले होते. तक्रार करणारी महिला पेशाने इंटीरिअर डिझायनर असून ती दिल्लीतच रहाते. मी सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपीची ओळख पटवली आहे. मला माझ्या सुरक्षेची आणि पुढे होणाऱ्या त्रासाची चिंता असल्यामुळे मी एफआयआर नोंदवण्यासंबंधी अंतिम निर्णय घेतलेला नाही असे या महिलेने सांगितले.

सोमवारी महिलेने लागोपाठ टि्वट करुन या घटनेची माहिती दिली व दिल्ली मेट्रोमधील महिलांच्या सुरक्षेचे काय? त्याबद्दल प्रश्न विचारला आहे. टि्वटरवर माहिती सार्वजनिक केल्यानंतर गुरुग्राम पोलिसांनी संपर्क साधला व तक्रार नोंदवण्यासाठी बोलावले. १४ जूनला रात्री ९.२५ च्या सुमारास मेट्रो स्टेशनवरील एका कपडयाच्या दुकानातून बाहेर पडल्यानंतर हा प्रकार घडला.

गुरुग्राम येथे एका मैत्रिणीला भेटण्यासाठी गेले होते. हुडा सिटी सेंटर मेट्रो स्टेशनवर उतरल्यानंतर टॉप विकत घेण्यासाठी मेट्रो स्टेशनवरील एका दुकानात गेले. दुकानातून बाहेर पडून शिडयांवरुन उतरत असताना माझ्या पाठिमागे काहीतरी चुकीचे घडत असल्याचे मला जाणवले. मी मागे वळून पाहिले तर एक जण माझ्या दिशेने हस्तमैथुन करत होता. मला या प्रकाराने धक्का बसला.

मी त्याला जाब विचारला तेव्हा त्याने मला अपशब्द सुनावले. मी त्याच्या कानाखाली मारली असे तक्रारदार महिलेने सांगितले. आम्हाला मोफत प्रवास नको. पण सुरक्षा हवी आहे. सुरक्षेची हमी प्रत्येक सरकार देते पण कोणीही सुरक्षाप्रदान करत नाही. रात्री ९.२५ ही खूप उशिराची वेळ झाली का? आम्हाला घराबाहेर पडण्याची भिती वाटते असे या महिलेने म्हटले आहे.

First Published on June 18, 2019 4:13 pm

Web Title: man flashed delhi metro station
Just Now!
X