News Flash

धक्कादायक! १० वर्षाच्या गतीमंद बहिणीची अडचण होऊ लागल्याने मित्रांसोबत जंगलात घेऊन गेला आणि…

मुलगी बेपत्ता झाल्यानंतर वडिलांनी पोलीस ठाण्यात केली होती तक्रार

संग्रहित छायाचित्र

आपल्याच १० वर्षाच्या गतीमंद बहिणीवर तीन मित्रांच्या मदतीने बलात्कार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जयपूरमधील मनोहरपूर येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी असणाऱ्या भावाने अडचण होत असल्याने बहिणीची मित्रांच्या मदतीने हत्या करण्याचा कट आखला होता. यासाठी १७ मे रोजी तिला एका निर्जनस्थळी नेलं होतं. पण हत्या करण्याआधी चौघांनीही तिच्यावर बलात्कार केला.

सर्व आरोपी १९ ते २१ वयोगटातील आहेत. पीडित मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तीन दिवसांनी मुलीच्या वडिलांना तिची चप्पल आणि कपडे पोलिसांकडे नेत जवळच्या जंगलाजवळ सापडल्याचं सांगितलं. यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता मुलीचा मृतदेह आढळला.

आणखी वाचा- मोबाइल रिचार्ज करण्यासाठी आईने पैसे दिले नाही म्हणून मुलाने उचललं टोकाचं पाऊल, केलं असं काही….

पोलिसांनी परिसरात अॅक्टिव्ह असणाऱ्या मोबाइल फोनचे नंबर मिळवले असता आरोपीचा शोध लागला. यानंतर पोलिसांना मुलीला शेवटचं तिच्या भावासोबत पाहिल्याचं सांगणारा साक्षीदारही सापडला. पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं असता आरोपी भावाने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी भाऊ आणि त्याच्या तिन्ही मित्रांना अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2020 11:53 am

Web Title: man gangrapes and murders mentally challenged sister with help of friends sgy 87
Next Stories
1 पाकिस्तान पुन्हा तोंडघशी; OIC मध्ये सौदी आणि युएईचं भारताला समर्थन
2 उत्तर भारतात उष्णतेची लाट; राजधानी दिल्लीसह इतर राज्यांसाठी ‘रेड अलर्ट’
3 आधी वाटलं सर्पदंशामुळे झाला अपघाती मृत्यू, मात्र नंतर समोर आलं सत्य अन्….
Just Now!
X