सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे. या व्हि़डिओमध्ये एक माणूस लॉकडाउनच्या काळात बाहेर पडलेला दिसत आहे. पण मग त्यात काय नवल? तर नवल हे की हा माणूस हातात एक बोर्ड घेऊन रस्त्यावरुन जाताना दिसत आहे. काय लिहिलं आहे या बोर्डवर…काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या सविस्तर!

सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक माणूस लॉकडाउन असताना रस्त्यावर फिरताना दिसत आहे. तो मिठाई घेण्यासाठी बाहेर पडलेला आहे. हे लक्षात येत आहे कारण त्याने त्याच्या गळ्यात एक बोर्ड लटकवला आहे. या बोर्डवर लिहिलं आहे की मिठाई घ्यायला जात आहे.

पश्चिम बंगालमधल्या चंदननगरमधला हा व्हिडिओ आहे. हा माणूस रस्त्याने चालत असताना त्याला पोलिसांनी अडवलं. तेव्हा त्याने पोलिसांना ही आपल्या गळ्यातली पाटी दाखवली. बंगाली भाषेत या पाटीवर लिहिलं होतं, मिठाई आणायला जात आहे.

नेटकऱ्यांना हा व्हिडिओ चांगलाच आवडलेला दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ वेगाने फॉरवर्ड केला जात आहे. एक युजर म्हणत आहे की हे फक्त पश्चिम बंगालमध्येच होऊ शकतं. तर दुसरा म्हणतोय की, पाहा, मिठाई ही बंगाली लोकांच्या आयुष्यात किती महत्त्वाची असतेय