01 March 2021

News Flash

सगोत्री विवाह करणाऱ्या तरुणावर मेहुण्याचा गोळीबार

हाताला गोळी लागल्याने गंभीर दुखापत, मुलीचे हल्लेखाेर भाऊ फरार

संग्रहित प्रतिकात्मक छायाचित्र

दिल्लीतील एका २५ वर्षीय पॉवर लिफ्टर तरूणास मुलीच्या कुटूंबीयांच्याविरोधात जाऊन सगोत्री विवाह करणे महागात पडले. त्याने असे केल्यामुळे बुधवारी रात्री तो घरी जात असताना त्याला अडवून, मुलीच्या भावांनी त्याच्यावर गोळी झाडत त्याला मारहाण केली. सुदैवाने गोळी त्याच्या हातालाच लागल्याने  तो केवळ गंभीर जखमी झाला.

बॉबी सिंग असे या तरूणाचे नाव आहे. त्याने सांगितले की, मी माझ्या खेळात भारताचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. मात्र आता माझ्या उजव्या हाताच्या कोपराला गोळी लागल्याने मला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती सध्या स्थिर आहे. ही घटना येथील उत्तम नगर परिसरात बुधवारी रात्री १०.३० वाजता घडली. नोव्हेबर २०१८ मध्ये लग्न केल्यानंतर हे जोडप पश्चिम दिल्लीत राहायला आल आहे.

पोलीस उप आयुक्त अल्फान्सो यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, हल्लेखोर नितीन व नीरज हे मुलीचे भाऊ आहेत. या घटनेनंतर दोघेही फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2019 12:31 pm

Web Title: man injured with a bullet shot by brothers of his wife
Next Stories
1 १९५१ पासून ‘या’ लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या विजयाची पाटी कोरीच
2 अलवर बलात्कार प्रकरण राजकीय नव्हे भावनिक : राहुल गांधी
3 हिटलरच्या वेषात ममता बॅनर्जींवर मीम; शाझिया इल्मी म्हणतात, तुला तुरुंगात जायचंय का?
Just Now!
X