News Flash

धक्कादायक ! शिक्षिकेचा खून केल्यावर शीर हातात घेऊन जंगलात पसार

शिक्षिकेचा खून केल्यानंतर आरोपी शीर कापून जंगलात पसार झाल्याची धक्कादायक घटना झारखंडमध्ये घडली आहे

शिक्षिकेचा खून केल्यानंतर आरोपी शीर कापून जंगलात पसार झाल्याची धक्कादायक घटना झारखंडमध्ये घडली आहे. हत्येनंतर पोलीस आणि जमाव पाठलाग करत असल्याने आरोपी शीर हातात घेऊन जवळपास पाच किलोमीटर धावत होता. आरोपीची मानसिक स्थिती योग्य नसल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे.

शाळेत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिलं जात असताना ही घटना घडली अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश कुमार यांनी दिली आहे. आऱोपीचं नाव हरी हेम्बराम असून दोन तासांनी त्याला अटक करण्यात आली. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांसमोर त्याला जमावापासून वाचवण्याचं सर्वात मोठं आव्हान होतं. संतप्त जमावाला रोखताना पोलीस कर्मचारीही जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एकटाच राहत असून शाळेच्या आवारात प्रवेश केल्यानंतर पीडित शिक्षिकेला ओढत आपल्या घरापर्यंत नेलं आणि तलवारीने वार करत शीर कापलं. घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आरोपी हातात शीर घेऊन पळाला असल्याचं त्यांना दिसलं. माहिती मिळताच मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. पण आरोपीच्या हातात तलवार असल्याने कोणीही पुढे जाण्याची हिंमत करत नव्हतं असं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी आरोपीवर गोळीबार करण्याचाही विचार केला होता, मात्र मोठ्या संख्येने लोक उपस्थित असल्याने हे शक्य नव्हतं. जमावाने पाठलाग सुरु असताना आरोपीने जंगलात पळ काढला. जवळपास पाच किमी अंतर त्याने पार केलं होतं. आरोपीला अटक केल्यानंतर जमावाने मारहाण करण्यास सुरुवात केली होता. त्यांना नियंत्रणात आणणं पोलिसांना अवघड झालं होतं. स्थानिकांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 6:08 pm

Web Title: man killed teacher and ran away with head in jharkhand
Next Stories
1 पावसामुळे साचलेल्या पाण्यात बाथटबमध्ये बसून पाकिस्तानी पत्रकाराचे रिपाेर्टिंग
2 FB बुलेटीन: सोनाली बेंद्रे कॅन्सरग्रस्त, अलिबागमध्ये सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न आणि अन्य बातम्या
3 शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करून दाखवलं – पंतप्रधान मोदी
Just Now!
X