28 September 2020

News Flash

बायकोची हत्या करुन नवऱ्याने मृतदेहाचे केले सहा तुकडे

पत्नीने अनैतिक संबंधांना विरोध केला म्हणून संतापलेल्या पतीने पत्नीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

पत्नीने अनैतिक संबंधांना विरोध केला म्हणून संतापलेल्या पतीने पत्नीची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली आहे. संजू देवी असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांना सोमवारी फालगु नदीत संजू देवीचा मृतदेह सापडला. एका बॅगमध्ये हा मृतदेह भरलेला होता. नदीत तरंगणाऱ्या बॅगमधून प्रचंड दुर्गंधी येत होती.

स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर नदीतून ही बॅग बाहेर काढण्यात आली. त्यामध्ये संजू देवीचा मृतदेह होता. आरोपीने मृतदेहाचे सहा तुकडे करुन बॅगेत भरले होते. संजू देवीचे अजय चौधरी बरोबर लग्न झाले होते. अजयचे गावातील एका महिलेबरोबर प्रेमसंबंध होते. दोघे मिळून आपल्या बहिणीला त्रास देत होते असा आरोप संजूचा भाऊ विनोद कुमारने केला आहे.

९ ऑक्टोंबरला अजयने संजूचे दागिने त्याच्या प्रेयसीला नेऊन दिले. जेव्हा संजूने याला विरोध केला तेव्हा दोघांनी मिळून तिला जबर मारहाण केली. संजूला ११ ऑक्टोंबरला शेवटचे पाहिले होते असे गावकऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी एफआयआर दाखल झाला असून अजयच्या प्रेयसीला अटक केली आहे. अजय आणि अन्य पाच जण फरार झाले असून त्यांना पकडण्यासाठी छापा सत्र सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2018 6:01 pm

Web Title: man kills wife cuts her body into pieces
Next Stories
1 सत्तेचे भुकेले भाजपा नेते पर्रिकरांना आरामही करु देत नाहीत – माजी RSS नेता
2 भारताला पुढील दहा वर्षांसाठी सशक्त आणि स्थिर सरकार हवंय-अजित डोवाल
3 तिसरं मुल दत्तक दिलं तरी निवडणूक लढवता येणार नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण आदेश
Just Now!
X