News Flash

मृत व्यक्तीच्या पोटातील अंजीराच्या बीमधून उगवले झाड, ४० वर्षांनंतर उलगडा

डोंगराळ भागातील गुहेमध्ये अंजीराचे झाड दिसले आणि...

मृत व्यक्तीच्या पोटातील अंजीराच्या बीमधून उगवले झाड, ४० वर्षांनंतर उलगडा
अंजीराचे झाड

तुर्कीमध्ये ४० वर्षांपूर्वी हत्या झालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह आश्चर्यकारकरित्या सापडला आहे. हो आता ही पहिली ओळ वाचूनच तुम्हाला धक्का बसला असेल तर पुढील माहिती अधिक धक्कादायक आहे. या व्यक्तीने मृत्यूपुर्वी खाल्लेल्या अंजिराच्या बियांमुळे हत्या करुन त्याचा मृतदेह ज्या ठिकाणी टाकण्यात आला होता तेथे अंजिराचे झाड उगवल्याने हा मृतदेह सापडला आहे. बसला ना धक्का. वाचायला थोडं विचित्र वाटत असेल तरी हे खरोखर घडले आहे.

२०११ साली काही संशोधकांना एका डोंगराळ भागातील गुहेमध्ये अंजीराचे झाड दिसले. या डोंगराळ भागामध्ये अंजीराचे झाड दूर्मिळ आहे त्यात हे झाड गुहेमध्ये उगवले होते. म्हणूनच हे झाड इथे कसे या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या दृष्टीने संशोधकांना शोध सुरु केला. त्यावेळी या झाड्याच्या मुळांजवळ खोदकाम केले असता तिथे एका मानवी सांगाडा सापडला. यासंदर्भात आणखीन चौकशी केली असता अशी माहिती समोर आली की हे झाड एका व्यक्तीच्या पोटामधील अंजीराच्या बीमधून उगवले आहे. ग्रीक सायप्रस आणि तुर्की सायप्रसच्या सैन्यामध्ये झालेल्या संघर्षात झालेल्या लढाईत ही व्यक्ती १९७४ साली मारली गेल्याचे माहिती समोर आली आहे. या ठिकाणी खोदकाम केल्यावर इतर दोन सांगाडेही सापडले आहे.

डेली मेलने यासंदर्भात दिलेल्या वृत्तामध्ये मृत व्यक्तीचे नाव अहमत हर्गुन असल्याचे म्हटले आहे. मृत्यूच्या काही तास आधी अहमतने अंजीर खाल्ले. त्यानंतर अहमतचा मृत्यू झाल्याने अंजीरचे पूर्णपणे पचन झाले नाही. याच पोटात राहिलेल्या बियांपैकी एका बीमधून झाड रुझल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. युद्धादरम्यान या गुहेमध्ये ज्या तीन जणांचा सांगाडा सापडला त्यांना डायनामाइटच्या सहाय्याने स्फोट करुन त्यांची हत्या करण्यात आली. यावेळी गुहेची थोडी पडझड झाल्याने गुहेमध्ये सूर्यप्रकाश येऊ लागला. त्यामुळेच या मृत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या अहमतच्या पोटांमधील अंजीराच्या बी रुझली आणि ४० वर्षानंतर त्याचे एक मोठे वृक्ष तयार झाले असे संशोधकांनी म्हटले आहे.

अहमतची बहीण मुनीर आता ८७ वर्षांची आहे. १९७४ साली या प्रदेशात ग्रीस विरुद्ध तुर्की असा संघर्ष सुरु झाला तेव्हा अहमतने तुर्किश रेजिस्टेंट ऑर्गनायझेशनच्या तुकडीमध्ये सहभाग घेतल्याचे मुनीर सांगते. त्यानंतर झालेल्या एका चकमकीमध्ये ग्रीसच्या सैनिकांनी तुर्कीच्या काहीजणांना ताब्यात घेतले. यामध्ये अहमतचाही समावेश होता. अहमत अचानक गायब झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याचा खूप शोध घेतला मात्र तो कुठेही सापडला नाही. अखेर या अंजीराच्या झाडाचे रहस्य उलगडताना अहमतच्या मृत्यूची ही आगळी वेगळी कथा समोर आली आहे. त्यामुळे मुनीर यांनी इतक्या वर्षानंतर अहमतच्या गायब होण्याच्या रहस्यावरील पडदा उठवल्याबद्दल धन्यवाद म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2018 5:20 pm

Web Title: man murdered 40 years ago body found after fig tree grew from seed in his stomach
Next Stories
1 सहा वर्षीय मुलीवर शाळकरी मुलांकडून बलात्कार, चुलत भावासह तिघांना बेड्या
2 पीएम चोर है! या ट्विटसाठी दिव्या स्पंदनांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा
3 Video : सरकारने दोन वर्षांपूर्वी पीओकेत केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे नवे व्हिडीओ पहा…