20 September 2020

News Flash

धारवाड दुर्घटना : ढिगाऱ्याखालून ६२ तासांनंतर एकाला जिवंत बाहेर काढण्यात यश

आजवर या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण अद्यापही बेपत्ता आहेत.

कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी (१९ मार्च) बांधकाम सुरु असलेली एक इमारत कोसळली होती. या अपघातातील ढिगाऱ्याखालून तब्बल ६२ तासांनंतर एका व्यक्तीला जिवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. आजवर या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण अद्यापही बेपत्ता आहेत. तर आजवर ५६ जणांना या ढिगाऱ्याखालून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. मृतांमध्ये उत्तर भारतातील मजुरांची संख्या अधिक आहे. हे लोक इमारतीमध्ये फरशा बसवण्याचे काम करीत होते.


कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर या दुर्घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आचारसंहिता लागू असल्याने मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर करु शकत नाही मात्र, राज्याच्या मुख्य सचिवांमार्फत मदत घोषीत करण्याचे आदेश देण्यात आल्याचे कुमारस्वामी यांनी सांगितले आहे.


या इमारतीचे चार मालक आणि डिझाईन बवलेल्या इंजिनिअरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालकांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली असून इंजिनिअरला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.


या घटनेची ताजी माहिती देताना उपायुक्त दीपा चोलान यांनी सांगितले की, एकूण १४ लोकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. काल आम्ही दोन लोकांना वाचवले होते. आणखी तीन लोक या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत त्यामुळे अजूनही इथले बचाव कार्य सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 1:59 pm

Web Title: man rescued from dharwad building collapse site today after 62 hours of incident
Next Stories
1 आम्ही बॅकफूटवर दहशतवादाशी लढा देत नाही, सॅम पित्रोदा यांना जेटलींचं उत्तर
2 मोबाइल जाहिरात क्षेत्रात अमेझॉनचं गुगल, फेसबुकला आव्हान
3 गौतम गंभीरचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
Just Now!
X