25 September 2020

News Flash

मोबाइलमध्ये प्रेयसीसोबतचे फोटो डिलीट करायला विसरला! त्यानंतर हत्या, आत्महत्या, चकमक

फोटो गॅलरीमधील माजी प्रेयसीसोबतचे फोटो डिलीट केल्याशिवाय त्याने फोन विकला. त्यानंतर धक्कादायक घटनांची मालिका सुरु झाली .

मेरठमध्ये राहणाऱ्या एका माणसाने फोटो गॅलरीमधील माजी प्रेयसीसोबतचे फोटो डिलीट केल्याशिवाय त्याचा फोन विकला. त्यानंतर धक्कादायक घटनांची मालिकाच सुरु झाली. मोबाइलमधल्या त्या फोटोंमुळे आत्महत्या, हत्या आणि चकमकीसारख्या भयानक घटना घडल्या. मोबाइलमधल्या त्या फोटोंमुळे शनिवारी मुझफ्फरनगरमध्ये एका ३५ वर्षीय विवाहित महिलेने पाच वर्षाच्या मुलासोबत पूलावरुन नदीत उडी मारली.

यामध्ये महिलेचा मृत्यू झाला पण पाच वर्षाच्या मुलाला वाचवण्यात यश आले. या फोटोंमुळे मेरठमध्ये रहाणाऱ्या या महिलेच्या सुखी वैवाहिक आयुष्यात वादळ आले. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे पूर्व प्रियकरासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. महिलेचा पूर्वप्रियकर शुभम कुमारने फोटो डिलीट केल्याशिवाय त्याचा फोन मेरठमध्ये रहाणाऱ्या अनुज प्रजापतीला विकला.

शुभम कुमारने हा फोन विकताना त्यातील फोटो डिलीट केले नव्हते. त्यामुळे हे फोटो व्हायरल झाले. आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलण्याआधी या महिलेने एका टपरीवाल्याच्या मोबाइलवरुन फोन केला होता. तपासामध्ये हा फोन नंबर मेरठमध्ये रहाणाऱ्या तिच्या नवऱ्याचा असल्याचे समोर आले. त्यावरुन तिची ओळख पटली.

अनुज प्रजापतीने व्हायरल केलेल्या फोटोमध्ये जी महिला होती त्याच महिलेने आत्महत्या केली असे मेरठचे एसपी अखिलेश नारायण सिंह यांनी सांगितले. त्यानंतर प्रजापतीचा सुद्धा मृत्यू झाला. फोटो व्हायरल केल्याच्या रागातून शुभम आणि त्याच्या मित्रानी २३ मे रोजी मेरठच्या कानकेरखेरा भागात अनुजची हत्या केली. महिलेला जेव्हा हे फोटो व्हायरल झाल्याचे समजले तेव्हा तिने शुभमला फोन करुन आपला राग व्यक्त केला.

त्यानंतर शुभमने अनुजची हत्या केली. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल फोनवरुन मेरठ पोलिसांनी अनुज प्रजापतीच्या मारेकऱ्यांचा शोध सुरु केला. मेरठ पोलिसांआधी सहारनपूर पोलिसांनी चकमकीनंतर संशयितांना बेडया ठोकल्या. दोन बाईकवरुन पळणाऱ्या पाचजणांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2019 2:47 pm

Web Title: man sells mobile phone ex girlfriends photos after murder suicide and encounter
Next Stories
1 पाकिस्तानातील ऐतिहासिक गुरूनानक महालाची तोडफोड
2 लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र
3 BLOG : अनाकलनीय ‘राज’कीय घटनांची श्रृंखला
Just Now!
X