News Flash

जेवण वाढायला विलंब केला म्हणून मुलाने आईची गोळी झाडून केली हत्या

सूरज दारुच्या नशेत घरी परतला होता

आईने रात्रीचे जेवण वाढायला उशीर केला म्हणून चिडलेल्या मुलाने आईची गोळी झाडून हत्या केली. दिल्लीच्या बवाना इंडस्ट्रीयल इस्टेट भागात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. घटनेच्यावेळी आरोपी सूरजने (२६) मोठया प्रमाणात मद्य प्राशन केले होते अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीला शस्त्रासह अटक केली आहे.

दारुच्या नशेत घरी परतल्यानंतर सूरजने आईला जेवण वाढायला सांगितले. पण आईने नकार दिला. तिने सूरजला शुद्धीवर आल्यानंतर घरी यायला सांगितले. त्यावरुन दोघांमध्ये वादावादी झाली. काही वेळाने तिने सूरजला जेवण वाढले. पण पुन्हा त्यांच्यात वाद सुरु झाला. तेव्हा सूरजने त्याच्याजवळच्या बंदुकीतून आईवर गोळी झाडली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- वयोवृद्ध आईला करोनाची लागण, बसस्थानकात एकटं सोडून मुलगा घरी परतला

गोळीचा आवाज ऐकून शेजारी त्याच्या घराच्या दिशेने धावले व त्यांनी तिथून पळून जाणाऱ्या सूरजला पकडले. पोलिसांच्या ताब्यात देण्याआधी त्यांनी सूरजला मारहाण केली. सूरजा एका फॅक्टरीमध्ये काम करतो. त्याने ओळखीच्या एका व्यक्ती जवळून ही पिस्तुल मिळवली होती असे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 3:08 pm

Web Title: man shoots his mother for delay in dinner dmp 82
Next Stories
1 घराणेशाहीवरुन मुख्तार अब्बास नक्वी यांची राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका; म्हणाले…
2 वयोवृद्ध आईला करोनाची लागण, बसस्थानकात एकटं सोडून मुलगा घरी परतला
3 करोनावर लस : मोदींच्या १५ ऑगस्टच्या भाषणासाठी ICMR करतंय अवास्तव दावा
Just Now!
X