04 March 2021

News Flash

सेक्स टॉकच्या नादात इंजिनिअर झाला न्यूड, महिलेनं केलं ब्लॅकमेल

डेटींग पोर्टलवरुन ओळख झालेल्या महिलेला हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल करणे एका तरुण इंजिनिअरला चांगलेच महाग पडले आहे.

डेटींग पोर्टलवरुन ओळख झालेल्या महिलेला हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल करणे एका तरुण इंजिनिअरला चांगलेच महाग पडले आहे. सदर महिला आता पैशांसाठी ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप इंजिनिअरने केला आहे. काडूगोडी येथे राहणाऱ्या या इंजिनिअरच्या तक्रारीवरुन पोलीस आता महिलेचा शोध घेत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

प्रिया सिंह अशी या महिलेने स्वत:ची ओळख करुन दिली होती. आपण राजस्थानचे आहोत असे त्या महिलेने इंजिनिअरला सांगितले होते. दुसऱ्या मुलाच्या प्रसूतीसाठी पत्नी तिच्या माहेरी गेलेली असताना डेटींग पोर्टलवरुन संबंधित महिलेशी संपर्क साधला असे या इंजिनिअरने पोलिसांना सांगितले. आपण महिला मैत्रिणीच्या शोधात असल्याचे इंजिनिअरने सांगितल्यानंतर लगेचच प्रियाने त्याला पिंग केले. काही तासात दोघे मनाने परस्परांच्या खूपच जवळ आले.

प्रियाने आपण राजस्थानचे असल्याचे सांगितले. तिने सेक्स टॉकसाठी सहमती दर्शवली अशी इंजिनिअरने पोलिसांना माहिती दिली. दोघांचे व्हॉट्सअॅपवरुन परस्परांना मेसेजेस सुरु झाल्यानंतर प्रियाने व्हिडीओ कॉलवर बोलण्याची इच्छा व्यक्त केली. २८ ऑक्टोंबरला रात्री प्रियाने मला व्हॉट्सअॅपवरुन व्हिडीओ कॉल केला. मी माझे कपडे उतरवले तर ती सुद्धा तसेच करेल असे तिने सांगितले.

मी तिच्यावर विश्वास ठेऊन न्यूड झालो. पण प्रिया समोरुन हसत होती व तिने कॉल डिसकनेक्ट केला असे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले. प्रियाने तीन व्हिडीओ कॉल केले व सर्व रेकॉर्ड केले. त्यानंतर प्रियाने मला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. मी पैसे दिले नाहीत तर व्हिडीओ सोशल मीडियावर अपलो़ड करण्याची तिने धमकी दिली. मी एक नोव्हेंबरला पेटीएमने ३० हजार ट्रान्सफर केले. त्यानंतर तिने पुन्हा १५ हजार मागितले तेव्हा मी पोलिसात तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला अशी तक्रारदार इंजिनिअरने पोलिसांना माहिती दिली.

सध्या महिलेचा फोन बंद आहे. तिने जे स्वत:चे नाव सांगितले ते खोटे असू शकते. तिला शोधून काढण्यासाठी आम्ही सायबर गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या पोलिसांची मदत घेत आहोत असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 2:21 pm

Web Title: man strip on whatsapp video call woman blackmail to extorts money dmp 82
Next Stories
1 राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?; जाणून घ्या या आधी महाराष्ट्रात कधी घडलं होतं असं
2 “शिवलिंगावर विंचू” या वक्तव्याबद्दल शशी थरुर यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट
3 राम मंदिराचे श्रेय घेणारे सुनावणीच्या तारखांवेळी कुठे होते..?
Just Now!
X