01 March 2021

News Flash

नग्न प्रवाशामुळे दुबई-लखनौ विमानात गोंधळ

विमानातील कर्मचाऱ्यांनी ब्लँकेटच्या आधारे त्याला गुंडाळून आपल्या ताब्यात घेतलं, त्यानंतर लखनौ येईपर्यंत त्याला...

(फोटो - एएनआय)

जर तुम्ही विमानाने प्रवास करत असाल आणि एखादा प्रवासी अचानक कपडे उतरवून विवस्त्र होऊन विमानात भटकंती करायला लागला तर…ऐकायला विचित्र वाटत असलं तरी असाच प्रकार एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात घडलाय. दुबईहून लखनौला येणाऱ्या आयएक्स- १९४ या विमानात ही घटना घडलीये.

शनिवारी(दि.29) 150 प्रवाशांना घेऊन आयएक्स- १९४ हे विमान दुबईहून लखनौसाठी निघालं होतं. विमान हवेत असताना अचानक एका प्रवासी चक्क नग्न झाला आणि तो विमानात फिरायला लागला. त्यामुळे प्रवाशांमध्ये काही वेळाकरता गोंधळाचं वातावरण झालं होतं, मात्र, थोड्याच वेळात विमानातील कर्मचाऱ्यांनी ब्लँकेटच्या आधारे त्याला गुंडाळून आपल्या ताब्यात घेतलं. त्यानंतर लखनौ येईपर्यंत त्याला एका सीटवर बसवून ठेवण्यात आलं.

विमान लखनौच्या चौधरी चरणसिंग विमानतळावर उतरताच या प्रवाशाला विमानतळावरील सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात देण्यात आलं. मात्र, अशाप्रकारचं कृत्या त्या व्यक्तीने का केलं याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही, तसेच यासंदर्भात अधिक तपास सुरू असल्याचे एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 11:49 am

Web Title: man strips walks naked mid air on air india express flight
Next Stories
1 वर्षाअखेरच्या ‘मन की बात’मध्ये मोदींकडून पुण्याच्या वेदांगीचे कौतुक
2 2019 निवडणुकांच्या तोंडावर पाकिस्तानला पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राइक’ची भीती
3 इजिप्तमध्ये पोलिसांची धडक कारवाई, ४० ‘दहशतवादी’ ठार
Just Now!
X