08 March 2021

News Flash

एकाच मांडवात केले दोन मुलींशी लग्न!

उदयपूर जिल्ह्यातील छत्रपूर गावात आदिवासी जमातीतील तरुण मुलाने एकाच मांडवात दोन मुलींशी लग्न करण्याचा प्रकार घडला आहे. भगवती लाल (वय २३)याने दोन्ही मुलींच्या परिवाराच्या संमतीने

| June 24, 2013 05:34 am

उदयपूर जिल्ह्यातील छत्रपूर गावात आदिवासी जमातीतील तरुण मुलाने एकाच मांडवात दोन मुलींशी लग्न करण्याचा प्रकार घडला आहे. भगवती लाल (वय २३)याने दोन्ही मुलींच्या परिवाराच्या संमतीने रविवारी एकाच मुहूर्तावर विवाह केला. योगायोगाने या दोन्ही मुलींचे नाव रेखा आहे. भगवती हा उदयपूर येथील कारखान्यात काम करतो, अशी माहिती झाडोल पोलीस ठाण्याच्या अधिका-याने दिली. भगवतीचे यातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते आणि ते दोघेही एकत्र राहात होते. त्यानंतर तो नाडी गावातील मुलीच्या प्रेमात पडल्याचे तेथील गावक-यांनी पोलिसांना सांगितले.
आदिवासी जमातीमधील नाता प्रथेनुसार एकापेक्षा अधिक महिलांशी संबंध ठेवता येतात. तरी सदर दोन्ही मुली या अल्पवयीन आहेत का, याचा तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. आदिवासी समाजाला हिंदू विवाह कायदा बहुदा लागू होत नाही. त्यामुळे याबाबत मी काहीही व्यक्त करु शकत नसल्याचे उदयपूरचे जिल्हाधिकारी विकास भाले यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2013 5:34 am

Web Title: man weds two brides in one mandap
Next Stories
1 आणखी एक मिग कोसळले, वैमानिक सुरक्षित
2 ‘भाजपला लक्ष्य करण्यासाठी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा वाद’
3 मुंबईसह सात शहरांत आता हेलिकॉप्टर्सच्या मदतीने टेहळणी
Just Now!
X