20 March 2018

News Flash

पंतप्रधान मोदी नीच व्यक्ती; मणीशंकर अय्यर यांची जीभ घसरली

टीका करताना अय्यर यांनी पातळी सोडली

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: December 7, 2017 5:05 PM

मणिशंकर अय्यर (संग्रहित छायाचित्र)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणी शंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना पातळी सोडली आहे. पंतप्रधान मोदी अतिशय नीच व्यक्ती असल्याचे अय्यर यांनी म्हटले. मोदींकडे किमान सौजन्य नसल्याची टीकाही त्यांनी केली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन करताना मोदींनी नीच राजकारण केले. या राजकारणाची काय गरज होती?,’ असा प्रश्नही अय्यर यांनी विचारला.

आज दिल्लीत डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी मोदींनी या केंद्राशी जोडलेल्या प्रत्येक विभागाचे अभिनंदन केले. या केंद्राच्या उद्घाटनानंतर उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी काँग्रेसवर नाव न घेता निशाणा साधला. ‘राष्ट्र उभारणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. हे योगदान दुर्लक्षित करण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र, तरीही ज्या कुटुंबाने असे प्रयत्न केले त्यांच्यापेक्षा आंबेडकरांचाच लोकांवर जास्त प्रभाव राहिला,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले.

मोदींच्या या टीकेला उत्तर देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांची जीभ घसरली. त्यांनी मोदींवर टीका करताना त्यांचा उल्लेख नीच व्यक्ती असा केला. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राच्या उद्घाटनावेळी मोदींना नीच राजकारण करण्याची गरज नव्हती असे अय्यर यांनी म्हटले. ‘हा अतिशय नीच प्रकारचा माणूस आहे. या माणसाकडे जराही सौजन्य नाही. अशा प्रसंगी त्यांना घाणेरडे राजकारण करण्याची काय आवश्यकता होती?,’ असे अय्यर यांनी म्हटले.

डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन करताना मोदींनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर नाव न घेता हल्लाबोल केला. ‘जे राजकीय पक्ष बाबासाहेबांचे नाव घेऊन मतांचा जोगवा मागतात, त्यांना आजकाल बाबासाहेब नव्हे तर बाबा भोले जास्त आठवतात,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी राहुल गांधींना टोला लगावला. ‘आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राची संकल्पना २३ वर्षांपूर्वी मांडण्यात आली होती. मात्र या केंद्राच्या उभारणीकडे मागील सरकारने दुर्लक्ष केले,’ असेही मोदींनी म्हटले.

First Published on December 7, 2017 5:04 pm

Web Title: mani shankar aiyar calls pm narendra modi neech and ill mannered
 1. ओमी
  Dec 7, 2017 at 9:47 pm
  या मणिशंकर आईयार ल मराठी महाराष्ट्राचा फार द्वेष आहे
  Reply
  1. Shivram Vaidya
   Dec 7, 2017 at 6:30 pm
   लोकनियुक्त आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विषारी आणि विखारी शब्द वापरून टीका करणारे मणिशंकर अय्यर, राहुल गांधी, पी. चिदंबरम, कपिल सिब्बल, सोनिया गांधी यांच्यासारखे खांग्रेसीच, खांग्रेसची अंत्ययात्रा काढण्यासाठी उतावीळ झालेले आहेत असे दिसते. तसे नसते तर मोदींवर हीन टीका करण्याऐवजी त्यांनी विकासाच्या खांग्रेसच्या पर्यायी योजनांची यादी देऊन प्रचार केला असता. पण त्यांच्याकडे केवळ फोडा-झोडा-लूटा यांचेच पेटंट असल्याने त्यांची कुवत अशी हीन टीका करण्यातच दिसते आहे. थू !
   Reply
   1. B
    baburao
    Dec 7, 2017 at 6:15 pm
    राहुल सारख्या जिंकण्याची अपेक्षा नसलेल्या पक्षाध्यक्षाच्या पठडीत यापुढील कार्यकाळ घालवायचाय या विचारानेच बहुतेक काँग्रेसी नेते विमनस्क झालेत. जीभ घसरणे हा त्यातीलच एक प्रकार आहे.
    Reply
    1. Shivram Vaidya
     Dec 7, 2017 at 6:12 pm
     आजकाल कोणीही उठाईगिरा पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या महान नेत्यावर टीका करत आहेत. देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारला ने ाबूद करण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाऊन, तेथील सरकारची, लष्कराची आणि पर्यायान दहशतवाद्यांची मदत मागणारा हा बेशरम माणूस कोणत्या तोंडाने मोदींवर टीका करत आहे? मणिशंकर अय्यर सारख्या बुद्रुक नेत्यांनीच देशावर ही वेळ आणली आहे. असे देशद्रोही नेतेच देशासाठी अतिशय घातक आहेत !
     Reply
     1. Nitin Deolekar
      Dec 7, 2017 at 6:08 pm
      मनी-शन्कर सारख्या सेक्युलर-सैतानांना लाज नाही? भारतात स्वातंत्र्यनंन्तर सत्तेवर आलेल्या ढोंगी-सेक्युलर-सैतानांना साधा समान नागरी कायदा सुद्धा करता आला नाही? त्यामुळे आता इथे गरीब मुस्लिम तरुण धर्मांध आयसिस अतिरेकी विचारणा बळी पडत आहे हे कटू सत्य आता कसे आणि कुठवर झाकणार?? पुढील ७० वर्षे महान?बुद्ध आंबेडकर यांचा हिंदू नागरी कायदा उलट करण्याची नितांत निकड आहे!! अल्प-संख्य बंधूना १-पत्नी कायदा करा चीनचा कुटुंब कायदा लावा: १-कुटुंब-१-मुलं, त्यातूनच त्यांची खरी प्रगती होईल !! चिनी सारखी, भरभराट होईल!! आंबेडकरी कायद्याने नाडलेल्या शाह बानो सारख्या लाखो मुस्लिम भगिनींना बीसी कोट्यात आरक्षण द्या..सानिया मिर्झा कडून शाळेत टेनिस शिकवा, मदरसा वेद-पाठशाळा १८ वर्षापर्यँत बंद करा. आणि हिंदूंना २-शादी लेखी-तलाक चे हक्क प्रदान करावेत. ७० वर्षांनंतर समान नागरी कायद्यासाठी प्रामाणिक-प्रयत्न जरूर करावे!! आयसिस ला आता कोण रोखणार? गांधीचा नोटेवरचा फोटो?? कि नेहरूचा पूत?? कि आंबेडकर सायबाचा मुंबईत होणार ३५०कोटीचं पुतळा-स्मारक?? आंबेडकर पुतळ्याचे ३५०कोटी ती इंदू मिलची जागा पण मुस्लिम शाळेला द्या..
      Reply
      1. S
       Suhas J.
       Dec 7, 2017 at 5:18 pm
       विनाशकाले विपरीत बुद्धी ...
       Reply
       1. S
        Swabhimani Bharatiya
        Dec 7, 2017 at 5:14 pm
        हि सगळी डुकराची पिल्लं गांधी परिवाराच्या घाणीवर गुजराण करतात.त्यामुळे नवल नाही. आधीच पाण्यात असलेली सिकुलर पार्टी यावेळेला,जमिनीत ली जाणार...! जय भारत
        Reply
        1. S
         shankarnarayan
         Dec 7, 2017 at 5:12 pm
         तू किती उंचच आहेस हे जनता जाणते !
         Reply
         1. Load More Comments