21 September 2020

News Flash

मणिपूरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक

गेल्या आठवडय़ात मणिपूरमध्ये ईशान्येकडील बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात १८ जवान हुतात्मा झाले होते.

| June 13, 2015 02:27 am

गेल्या आठवडय़ात मणिपूरमध्ये ईशान्येकडील बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात १८ जवान हुतात्मा झाले होते. यानंतर पाच दिवस शोध घेऊन लष्कराने म्यानमारमध्ये २० अतिरेकी ठार केल्यानंतर आता  नॅशनॅलिस्ट सोशालिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड (एनएससीएन) संघटनेच्या दोघांसह एकूण तीन मूलतत्त्ववाद्यांना आज मणिपूरमध्ये अटक केली आहे.
पश्चिम इम्फाळ जिल्ह्यात एका शोध मोहिमेदरम्यान येथील एका सुपरमार्केटमधून ११ जूनला एनएससीएन-के चा  स्वयंघोषित अध्यक्ष खुमलो अबी अनाल याला अटक करण्यात आल्याची माहिती मणिपूर पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.  तसेच, एनएससीएन -के चा सक्रिय सदस्य पम्मेई काकिलाँग अलिआस कालिंग याला तमेंगलाँग जिल्ह्यातील चिंगखुलाँग येथून अटक केली.
पूर्व इम्फाळ पोलीस आणि आसाम रायफल्स यांनी संयुक्तपणे केलेल्या शोध मोहिमेत कियामगेई गावातून कांगलेईपाक कम्युनिस्ट पार्टीचा सक्रिय सदस्य मोहम्मद जहिद अली (वय २२) याला अटक करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ही शोध मोहिम १० जूनला करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 2:27 am

Web Title: manipur ambush two nscn k militants arrested by police in search operations
Next Stories
1 एअर इंडियाच्या विमानातील जेवणात आढळली पाल
2 अभिनेते ख्रिस्तोफर ली कालवश
3 ईशान्य भारतात‘हाय अ‍ॅलर्ट’
Just Now!
X