राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेसाठी अमेरिकेला गेलेले भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आज(शुक्रवार) अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची वॉशिंग्टन येथे भेट घेणार आहेत. ओबामा यांच्यासोबत पंतप्रधान मनमोहन सिंग द्विपक्षीय संबंधांवर चर्चा कणार असून, भविष्यामध्ये सौरक्षण, व्यापार, गुंतवणूक आणि नागरी अणु सहकार्यावर चर्चा करणार आहेत. सर्वात महत्त्वाच्या दहशतवादाच्या मुद्यावर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. वॉशिंगटन येथे पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान सिंग यांनी अमेरिका भारताचा भविष्यकालीन वाटचालीसाठी धोरणात्मक सहकारी देश असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, काल जम्मू-काश्मिरवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान सिंग पाक पुरस्कृत लष्करे तयब्बाच्या भारतामधील सततच्या दहशतवादी कारवायांसंदर्भामध्ये व पाकिस्तानमध्ये मोकाट फिरणारा जमाते दावाचा प्रमुख हाफिज सईद संदर्भामध्ये ओबामा यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.