भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध एकत्रितपणे लढण्यासाठी डाव्या पक्षांनी राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या नेतृत्वाला सहकार्य करावे, अशी विनंती माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केली आहे.

राष्ट्रीय स्तरावर आपण भाजपचा संयुक्त आघाडी म्हणून विरोध करणार का, की माकप भाजप आणि काँग्रेसला एकाच अंतरावर ठेवणार, असा सवाल डॉ. मनमोहन सिंग यांनी एका जाहीर सभेत केला.

भाजपचा गैरकारभार आणि फुटीच्या धोरणांचा एकत्रित मुकाबला करण्यासाठी डाव्यांनी काँग्रेसला सहकार्य करावे, अशी विनंती या वेळी माजी पंतप्रधानांनी केली. केरळमधील सरकारवरही डॉ. सिंग यांनी टीका केली. राज्यात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, महिलांना सुरक्षित वाटत नाही आणि आर्थिक घडी मंदावली आहे, असेही ते म्हणाले.