24 January 2021

News Flash

“कृषी क्षेत्रात सुधारणा होऊ नयेत यासाठी मनमोहन सिंग, शरद पवारांवर होता दबाव”

कृषी मंत्री तोमर यांची माहिती

कृषी क्षेत्रात सुधारणा होऊ नयेत यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर बाहेरील शक्तींचा दबाव होता, असा खळबळजनक दावा केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केला आहे. काही शेतकरी संघटनांशी तो सोमवारी बोलत होते.

तोमर म्हणाले, “अनेक आयोग, मंत्री, अनेक मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारांनी कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याच्या दिशेने अनेक प्रयत्न केले. युपीएच्या कार्यकाळात तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि कृषी मंत्री शरद पवार यांनाही ही कृषी क्षेत्रातील या सुधारणा लागू करायच्या होत्या. मात्र, त्यांच्यावर दबाव असल्याने ते याची अंमलबजावणी करु शकले नाहीत.”

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलकांशी पुन्हा सरकार चर्चा सुरु करणार असल्याच्या एक दिवस आधीच कृषी मंत्री तोमर यांनी हे विधान केलं आहे. विविध शेतकरी संघटनांच्या एका संयुक्त समितीने देखील तोमर यांची भेट घेऊन त्यांच्या कृषी कायद्यांना आपला पाठींबा असल्याचे सांगितले.

आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकच मिशन आहे ते म्हणजे विकास. जनतेचं भलं व्हावं हेच त्यांचं एकमेव मिशन आहे. कोणत्याही प्रकारचा दबाव मोदींवर काम करु शकत नाही. या शक्ती याध्ये अपयशी ठरल्याने त्या आता विफल झाल्या आहेत, असंही तोमर यावेळी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 4:49 pm

Web Title: manmohan singh sharad pawa were under pressure not to reform the agricultural sector auu 85
Next Stories
1 जाता जाता… विमानतळाला स्वत:चं नाव देण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा विचार
2 फेक एन्काऊंटर; जवानांनी अतिरेकी समजून मजुरांनाच मारलं, नंतर दाखवले दहशतवादी
3 ए. आर. रेहमान यांना मातृशोक; करीमा बेगम यांचे निधन
Just Now!
X