मुझफ्फरनगरमध्ये धार्मिक दंगलीं घडवून आणणाऱया समाजकंटकांना कडक शिक्षा केली जाईल, असे आश्वासन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सोमवारी दंगलपीडितांना सोमवारी दिले. 
उत्तर प्रदेशचा ‘गुजरात’ होणार नाही – मुलायमसिंह यादव

पंतप्रधानांसह यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी सकाळी उत्तर प्रदेशातील दंगल उसळलेल्या मुझफ्फरनगरला भेट दिली. यावेळी त्यांनी मुझफ्फरनगरमधील बस्सीकलान भागातील दंगलपीडितांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून घडल्या प्रकाराची माहिती घेतली. अनेक पीडितांना पंतप्रधानांसमोर आपली व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले. यावेळी पंतप्रधानांनी दंगल घडवून आणणाऱया समाजकंटकांना कठोरतील कठोर शिक्षा केली जाईल, असे आश्वासन दिले. दंगलींमुळे विस्थापित झालेल्यांना पुन्हा आपल्या घरी पाठवणे, यालाच सरकारचे प्राधान्य राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुझफ्फरनगर हिंसाचारामागे राजकीय पक्ष?