गेल्या काही दिवसात सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना आणि पाकिस्तानी रेंजर्सशी लढताना भारताचे अनेक जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानी सैन्यावर आपण स्वतःहून कधीही हल्ला केला नाही. कारण आपण शांततेवर विश्वास ठेवतो, मात्र असे असले तरी देशाच्या सन्मानाशी आणि जवानांच्या बलिदानाशी कधीही तडजोड करणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ‘मन की बात’ या आपल्या रेडिओवरील कार्यक्रमात त्यांनी रविवारी जनतेशी संवाद साधला.

Live Blog

12:02 (IST)30 Sep 2018
३१ ऑक्टोबरला देशभरात एकता दौडचे आयोजन करण्याचे आवाहन

३१ ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे.  यानिमित्त यावर्षीही 'रन फॉर युनिटी'चे आयोजन करण्याचे आवाहन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ही एकता दौडच त्यांचे स्मरण करण्यासाठी योग्य आहे. ही एकता दौड देशातील प्रत्येक गाव, शहर आणि महानगरांमध्ये आयोजित व्हावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

11:57 (IST)30 Sep 2018
२ ऑक्टोबर लाल बहादुर शास्त्रींचा जन्मदिवसही मोठ्या उत्साहात साजरा करणार

२ ऑक्टोबर हा दिवस आपण लाल बहादुर शास्त्री यांचा जन्मदिवसही आपण उत्साहाने साजरा करणार आहोत. असे सभ्य व्यक्तीमत देशातील प्रत्येकाला प्रेरणा देत राहिल. त्यांची जय जवान, जय किसान ही घोषणा त्यांच्या विराट व्यक्तीमत्वाची ओळख करुन देते. 

11:53 (IST)30 Sep 2018
'स्वच्छता ही सेवा' अभियानाशी करोडो लोक जोडले - पंतप्रधान

१५ सप्टेंबरपासून 'स्वच्छता ही सेवा' हे नवे अभियान सुरु करण्यात आले आहे. करोडो लोक या अभियानाशी जोडले गेले तसेच मलाही यात सहभागी होण्याचे भाग्य लाभले. यासाठी मी दिल्लीतील डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या शाळेत जाऊन मी स्वच्छता श्रमदान केले. देशातील प्रत्येक समाजातील लोक यात सहभागी झाले. म्हणूनच स्वच्छता प्रेमी देशवासियांना मी ह्रदयापासून धन्यवाद देतो. 

11:48 (IST)30 Sep 2018
गांधीजींच्या १५०व्या जयंती निमित्त पुढील २ वर्षे जगभरात कार्यक्रम

महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त आजपासून पुढील २ वर्षांसाठी जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महात्मा गांधींच्या विचारांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले आहे. ज्युनिअर मार्टिन ल्युथर किंग असो वा नेल्सन मंडेला प्रत्येकाला गांधीजींच्या विचारांनी शक्ती मिळली. त्यामुळे हे आपल्या लोकांसाठी समानता आणि सन्मानाचा हक्क मिळवून देण्यासाठी मोठी लढाई लढू शकले.

11:40 (IST)30 Sep 2018
गांधीजींचा 'तो' प्रेरणादायी मंत्र आजही लागू होतो - पतंप्रधान

गांधीजींना आपल्या सर्वांना एक प्रेरणादायी मंत्र दिला होता. तो गांधींजींचा मंत्र म्हणून ओळखला जातो. समाजातील सर्व लोकांना मदत करण्याचा तो मंत्र असून आजही आपल्यासाठी तितकाच लागू होतो. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही स्वरुपाची खरेदी करताना त्या वस्तूच्या निर्मितीसाठी कष्ट घेणाऱ्याचा फायदाही पहायला हवा, असे आवाहन यावेळी पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना केले.

11:35 (IST)30 Sep 2018
नौदल अधिकारी अभिलाष टॉमी यांचे साहस तरुणांसाठी प्रेरणादायी

नौदलाचे अधिकारी अभिलाष टॉमी समुद्रात मृत्युशी झुंज देत होते. छोट्या बोटीवर स्वार होऊन ते विश्वभ्रमण करणारे पहिले भारतीय आहेत. अभिलाष टॉमी ते धाडसी सैनिक आहेत. त्यांचे साहस, संकल्पशक्ती, झुंजण्याची ताकद तरुणांना प्रेरणा देईल. त्यांच्याशी फोनवरुन बोललो तेव्हा त्यांनी पुन्हा असा पराक्रम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

11:29 (IST)30 Sep 2018
हवाई दल संकटसमयी मदतीसाठी नेहमीच आघाडीवर राहिले

देशाच्या हवाई दलाने नेहमी पुढे राहत संकटामध्ये बचाव आणि मदत कार्य केले आहे. हवाई दलाने पुन्हा एकदा अशीच कामगिरी केली आहे.

11:26 (IST)30 Sep 2018
देशाची शांतता भंग करणाऱ्यांना आपले जवान सडेतोड उत्तर देतील

आपल्या देशाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जवानांनी योग्य आणि सडेतोड उत्तर देतील. २०१६मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्येही आपल्या जवानांनी आपली कामगिरी योग्य प्रकारे केली. 

11:21 (IST)30 Sep 2018
शत्रूला सडेतोड उत्तर देणाऱ्या जवानांच्या सर्जिकल स्ट्राइकची आपण आठवण ठेवली