News Flash

संघातील वादाच्या पाश्र्वभूमीवर मनोहर पर्रिकर गोव्यामध्ये

पर्रिकर यांचे शनिवारी रात्री गोव्यात आगमन झाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा प्रांताचे संघचालक सुभाष वेलिंगकर यांची हकालपट्टी करण्यात आल्यामुळे संघटनेत निर्माण झालेल्या वादळाच्या पाश्र्वभूमीवर संरक्षणमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर या राज्यात पोहोचले आहेत.

पर्रिकर यांचे शनिवारी रात्री गोव्यात आगमन झाले. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना भेटण्याची शक्यता असल्याचे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ओळख उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. या प्रकरणाचे संवेदनशील स्वरूप लक्षात घेऊन या दोन नेत्यांची भेट माध्यमांच्या नजरेपासून दूर ठेवण्याची काळजी घेण्यात आली आहे.

या भेटीत पर्रिकर हे राज्यातील भाजप नेत्यांना भेटण्याची अपेक्षा आहे. सोमवारी राज्यात गणेशाची स्थापना होत असल्यामुळे ते मंगळवापर्यंत येथे राहतील असा अंदाज व्यक्त होत आहे. म्हापसाजवळील पर्रा येथील आपल्या मूळ गावी ते गणेशोत्सवात सहभागी होतील.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 1:21 am

Web Title: manohar parrikar visit goa
Next Stories
1 शिफारशींचे पालन न केल्याने १२३ गायींचा मृत्यू
2 पनामा पेपर्स प्रकरणातील भारतीयांच्या व्यवहारांची माहिती मिळवण्यासाठी विनंतीपत्रे
3 चीनच्या चित्रकाराने साकारले मोदींचे चित्र, ४ महिन्यांच्या मेहनतीची मोदींकडून प्रशंसा
Just Now!
X