News Flash

…म्हणून मोदींनी सकाळी सात वाजताच घेतली लस; जाणून घ्या या लसीकरणाचे ‘इलेक्शन कनेक्शन’

आजपासून करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झालाय

(Photo: Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनाची लस घेतली आहे. आजपासून देशात करोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे. ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण या टप्प्यात करण्यात येणार आहे. या टप्प्याची सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सकाळी सातच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयामध्ये लसीची पहिला डोस घेतला. यासंदर्भातील फोटो मोदींनीच ट्विट केला आहे. मात्र मोदींनी सकाळी जाऊन लस का घेतली तसेच या लसीकरणाचा वेगवेगळ्या राज्यांमधील आगामी निवडणुकांशी काय संबंध आहे यासंदर्भातील माहिती आता समोर आलीय.

नक्की पाहा >> मोदींच्या लसीकरणाचे फोटो: जाणून घ्या कोणती लस घेतली?, पुढील डोस कधी? अन् लस घेतल्यावर ते काय म्हणाले?

मोदींनी ट्विटरला फोटो ट्विट करत ही माहिती दिली आहे. “एम्स रुग्णालयात करोनाचा पहिला डोस घेतला. करोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीने काम केलं ते कौतुकास्पद आहे,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, “जे जे लोकं लसीकरणासाठी पात्र आहेत त्यांनी लस घ्यावी असं मी आवाहन करतो. आपण मिळून भारताला करोनामुक्त करुयात” असंही मोदी या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

मात्र आता मोदींनी एवढ्या सकाळी येऊन का लस घेतली यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींनी लस देणाऱ्या नर्सचे नाव पी निवेदा असं आहे. तसेच नरेंद्र मोदींनी सकाळी सातच्या सुमारास एम्सला भेट दिली कारण सर्वसामान्यांना पंतप्रधानांच्या भेटीमुळे काही अडचण होऊ नये अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळेच मोदींच्या या लसीकरणासंदर्भातील भेटीदरम्यान विशेष मार्ग तयार करणे आणि वाहतुक नियंत्रणासंदर्भातील इतर गोष्टी टाळण्यात आल्याचे समजते.

केळव सर्वसमान्यांना त्रास होऊ नये याबरोबरच मोदींच्या या लसीकरणादरम्यान वेगवेगळ्या राज्यांमध्ये येऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकींसंदर्भातील काही कनेक्शन यावेळी दिसून आले. मोदींनी गळ्यामध्ये आसामी लोकांची ओळख आणि प्रतिक मानला जाणारा गमछा घातला होता. हा गमछा त्यांना काही आसामी महिलांनी भेट दिला होता. मोदींसोबत फोटोमध्ये दिसणाऱ्या नर्सपैकी एकजण पुद्दुचेरीची तर दुसरी केरळची आहे.

मागील काही दिवसांमध्ये मोदी अनेकदा हा आसामी गमछा घालून दिसून आलेत, असंही सांगण्यात येत आहे. मोदींनी सर्वसामान्यांना आपल्या भेटीमुळे काही अडचणी येऊ नयेत, वाहतुक व्यवस्थेवर परिणाम होऊ नये म्हणून सकाळीच लसीकरण करुन घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच पहिली गोष्ट म्हणजेच गमछा आणि नर्सची निवड या दोन गोष्टींचा निवडणुकांशी संबंध जोडला जात आहे.

केंद्र शासनाच्या आदेशानुसार करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा आज, सोमवार १ मार्चपासून सुरू होतोय.  वय वर्षे ६० तसेच  ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण या तिसऱ्या टप्प्यामध्ये केले जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 8:18 am

Web Title: many symbols from states of ongoing poll fights in pm narendra modi vaccine taking event scsg 91
Next Stories
1 नरेंद्र मोदींनी घेतली करोना लस; देशवासियांना आवाहन करत म्हणाले…
2 निर्बंध पाळून कुंभमेळा
3 ‘लस दरावरील मर्यादा हा कंपन्यांचा विश्वासघात’
Just Now!
X