नक्षलवाद्यांनी बिहारच्या गया जिल्ह्यातील एक पोलिस स्टेशनवर आज हल्ला चढवला. या पोलीस स्टेशनमधील कम्युनिटी हॉल त्यांनी स्फोटकांच्या मदतीने उडवून दिला. या स्फोटात आणखी दोन बांधकामे उद्धस्त करण्यात आली. मात्र, या हल्ल्यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, स्फोटकांच्या मदतीने उडवून देण्यात आलेल्या या दोन्ही ठिकाणांची बांधकामे सुरु होती. याठिकाणी पोलिसांसाठी नव्या चौक्या उभारण्यात येणार होत्या. पोलिसांच्या माहितीनुसार, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) या पक्षाच्या आर्म स्क्वाडने हा हल्ला घडवून आणला. गया जिल्ह्यातील धांगई गावात हा प्रकार घडला. रविवारी रात्री उशीरा डायनामाईट्स या स्फोटकांच्या मदतीने नक्षलवाद्यांनी ही इमारत उडवून दिली. सीआरपीएफ आणि एसएसबी जवानांना नक्षलवादविरोधी कारवायांसाठी या इमारतीचा वापर करण्यात येणार होता.

धांगई हे दुर्गम भागातील गाव असून हल्ल्यानंतर सोमवारी दुपारी या ठिकाणी पोलीस पोहोचले. या घटनेला शेरघाटीचे उपविभागीय अधिकारी ज्योती कुमार यांनी दुजोरा दिला असला तरी अधिक माहिती देण्यास नकार दिला. उलट या प्रकरणी अद्याप अधिक माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

बिहार झारखंड सीमेवर केंद्रीय सुरक्षा दलाच्या सहकार्यासाठी स्थानिक पोलिसांकडे कामगिरी सोपवण्यात आली आहे. त्यासाठी काही पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. मात्र, पोलिसांवरील हल्ल्यांबरोबर त्यांची उपकरणे उद्ध्वस्त करण्याचे काम करीत असतात.

[jwplayer VrTpU9cG]