बिहारमधील पूर्व-उत्तर विभागात गया शहराजवळ माओवाद्यांनी शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास रेल्वेमार्ग उद्ध्वस्त केला. माओवाद्यांच्या या विध्वंसक कृत्यामुळे गया ते मोगलसराईदरम्यानची रेल्वे वाहतूक मोठय़ा प्रमाणावर विस्कळीत झाली. तरारिया आणि गुरारू रेल्वेस्थानकांदरम्यान माओवाद्यांनी स्फोट घडवून रेल्वेमार्ग उडवून दिला.